lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

Ashok patil earned income of lakhs of rupees at a low cost as an inter crop in the sitafal garden | अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

प्रयोगशील शेतकऱ्याचा आंतरपिकाचा अभिनव प्रयोग

प्रयोगशील शेतकऱ्याचा आंतरपिकाचा अभिनव प्रयोग

शेअर :

Join us
Join usNext

गोविंद शिंदे

नांदेड जिल्ह्यातील येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतात अभिनव प्रयोग करून एका खर्चात तीन पिके घेऊन लाखोचे उत्पन्न मिळवले आहे. दोन एकरांत सीताफळाच्या बागेत कलिंगड आणि मिरचीची लागवड करून कलिंगडाच्या पिकात पाच लाख रुपये उत्पन्न घेतले. यामध्येच सीताफळचे तीन लाख घेऊन आता मिरची लागवड केली असूनआणखी उत्पन्न घेण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात एकाच खर्चातील पिके घेऊन अभिनव प्रयोग केला आहे.

बाचोटी येथील प्रगतशील शेतकरी अशोक भोसकर व त्यांचे संपूर्ण कुटुंब पूर्ण वेळ शेतीसाठी देत आहे. त्यांच्या शेतात नेहमी नवनवीन पिकांची वेलवर्गीय फळ पिकाची लागवड करण्यात येते. दरवर्षी हे कुटुंब शेतामधून काही महिन्यांतच लाखोंच्या घरात उत्पन्न काढतात.

फक्त उत्पन्न काढत नाही तर त्याला योग्य वेळी योग्य बाजारसुद्धा मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. एक असाच नवीन प्रयोग त्यांनी यावर्षी केला आहे. दोन एकरांत जून २०२० मध्ये सीताफळाची लागवड केली आठ बाय १४ वर सीताफळाची ८०० रोपे लावली.

तिसऱ्या वर्षापासून म्हणजे नोव्हेंबर- डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी या सीताफळाचे एक लाख तीस हजार रुपयांचे उत्पन्न काढले. त्यानंतर त्यांनी टरबूज लागवड केली. त्यामध्येच सव्वा फुटांचे अंतर ठेवून मिरचीची लागवड केली. त्यांना ४० टनाचे उत्पन्न टरबुजाचे मिळाले. त्यातून पाच लाखांचे उत्पन्न झाले आहे.

शेतमजूर ते यशस्वी उद्योजक रंजनाताईंची यशस्वी वाटचाल

कमी कालावधीची पिके घ्या! अशोक पाटलांचा सल्ला 

  •  सध्या शेतकरी सर्वत्र ऊस या पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ऊस पिकाला बारा महिने पाणी मेहनत जोपासना करण्याचे अधिकचा वेळ लागतो.
  • यामुळे ऊस लागवड न करता- तीन महिन्यांत पिके घेऊन कमी कालावधीत भरपूर उत्पन्न घ्यावे, असा सल्ला अशोक पाटील भोसकर यांनी इतरांना दिला आहे.

Web Title: Ashok patil earned income of lakhs of rupees at a low cost as an inter crop in the sitafal garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.