Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > शेतकरी महिलेचे फेसबुकवर तब्बल साडेसात लाख फॉलोअर्स, आता गावातील महिलांना..

शेतकरी महिलेचे फेसबुकवर तब्बल साडेसात लाख फॉलोअर्स, आता गावातील महिलांना..

A farmer woman has as many as seven and a half lakh followers on Facebook, now the women of the village.. | शेतकरी महिलेचे फेसबुकवर तब्बल साडेसात लाख फॉलोअर्स, आता गावातील महिलांना..

शेतकरी महिलेचे फेसबुकवर तब्बल साडेसात लाख फॉलोअर्स, आता गावातील महिलांना..

शेतात पायही न ठेवलेल्या महिलेने लग्नानंतर धरली शेतीची कास...

शेतात पायही न ठेवलेल्या महिलेने लग्नानंतर धरली शेतीची कास...

छत्रपती संभाजीनगर लग्न होईपर्यंत शेतात पायसुद्धा न ठेवलेल्या पेंडगाव (ता. फुलंब्री) येथील सविता डकले या लग्नानंतर पतीसोबत शेतीमध्ये रमल्या. शेती ही नोकरीपेक्षा कमी नाही, असे सांगणाऱ्या सविता यांनी गावातील महिलांनाही सक्षम आणि डिजिटल साक्षर बनविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली.

शेती करताना त्यांना आलेल्या विविध समस्यांवर त्यांनी उपायही शोधले. कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांनी केलेला शाश्वत शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. आपल्या ज्ञानाचा इतरांना लाभ व्हावा, यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर सुरू केलेल्या त्यांच्या पेजचे आज साडेसात लाख फॉलोअर्स आहेत.

'वूमन इन ॲग्रीकल्चर' या नावाने सविता डकले सोशल मीडियावर परिचित आहेत. दहावीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या सविता यांचे लग्न २० वर्षापूर्वी पेंडगाव येथील सुनील डकले यांच्यासोबत झाले. यानंतर त्या पती आणि सासू सासऱ्यांसोबत शेतात जाऊ लागल्या. त्यांच्याकडूनच त्या शेतातील कामे शिकल्या. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सविता कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घ्यावे, यासाठी विचार करू लागल्या.

रासायनिक खत, कीटकनाशक यांचा वापर केल्याने उत्पादन खर्च वाढतो, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी शेतात विविध प्रयोग सुरू केले. यातच त्या रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खत, गांडूळ खत, रासायनिक कीटकनाशकाऐवजी लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर करू लागल्या. त्यांच्या या शाश्वत शेतीच्या प्रयोगाला यश आले. कमी खर्चात उत्पादन वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले.

वूमन इन ॲग्रीकल्चर

प्रारंभी त्यांनी गावातील काही महिलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. सेवाभावी संस्थेच्या कामात त्या सहभागी झाल्या. महिलांचा बचतगट स्थापन केला. महिलांना प्रशिक्षण देणे सुरु केले. बँक खाते उघडणे, आधार लिंक करणे, ऑनलाइन पेमेंट अॅप्लिकेशन कसे वापरायचे, याबाबतचे प्रशिक्षण दिले. फेसबुकवर अकाउंट सुरु केले. तेथेही त्या शेतीविषयी पोस्ट शेअर करू लागल्या. नंतर त्यांनी फेसबुकवर 'वूमन इन अॅग्रिकल्चर' हे पेज सुरू केले.

आयआयटी पवईमध्ये व्याख्यान

सविता यांना काही महिन्यांपूर्वी आयआयटी, पवई यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी तेथे व्याख्यान दिले होते. शिवाय त्यांच्या वाढत्या फॉलोअर्सची संख्या पाहता, फेसबुकच्या दिल्ली /कार्यालयाने त्यांना सन्मानित केले.

Web Title: A farmer woman has as many as seven and a half lakh followers on Facebook, now the women of the village..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.