अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कृषी विभागाने सुरू केली आहे.
दरवर्षी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. कृषी विभागातर्फे शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविण्यात येतात.
यात अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा समावेश आहे. या योजनेत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी उपकरणांसाठी अनुदान मिळते.
तसेच नवीन विहीर, जुन्या विहिरींची दुरुस्ती, कूपनलिका, वीज जोड, पंप सेट, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तर, स्प्रिंकलर सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळते.
योजनेचा लाभ असा
- नवीन विहीर घेण्यास ४ लाखांचे अनुदान.
- जुनी विहीर दुरुस्तीस १ लाख.
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण २ लाख.
- इनवेल बोअरिंग ४० हजार.
- वीजजोडणी २० हजार.
- पंपसंच (डिझेल किंवा विद्युत) ४० हजार.
- सोलर पंप ५० हजार.
- तुषार सिंचन संच ४७ हजार.
- ठिबक सिंचन संच ९७ हजार.
- एचडीपीई किंवा पीव्हीसी पाइप ५० हजार.
- शेती अवजारे ५० हजार.
- परसबाग ५ हजार.
योजनेच्या अटी
- लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असावा.
- शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकान्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
- विहिरीचा लाभघ्यायचा असल्यास ०.४० हेक्टर शेतजमीन असायला हवी.
महाडीबीटीवर ऑनलाइन करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, तसेच अधिक माहितीसाठी पंचायत समितीमधील कृषी विभागात अथवा जिल्हा परिषदेतील कृषी विभागात संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अधिक वाचा: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे टॉप ५ वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर