Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

Which improved and hybrid varieties give higher yield in pearl millet crop? Read in detail | बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

बाजरी पिकात अधिक उत्पादन देणारे सुधारित व संकरित वाण कोणते? वाचा सविस्तर

Bajari Lagwad बाजरी हे पिक कमी कालावधीमध्ये तयार होणारे व पाण्याचा ताण सहन करू शकणारे, तसेच आपत्कालीन पीक व्यवस्थापनात एक आशादायी पीक आहे.

Bajari Lagwad बाजरी हे पिक कमी कालावधीमध्ये तयार होणारे व पाण्याचा ताण सहन करू शकणारे, तसेच आपत्कालीन पीक व्यवस्थापनात एक आशादायी पीक आहे.

बाजरी हे पिक कमी कालावधीमध्ये तयार होणारे व पाण्याचा ताण सहन करू शकणारे, तसेच आपत्कालीन पीक व्यवस्थापनात एक आशादायी पीक आहे.

बाजरी हे पीक महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम जमिनीत घेतले जाते. बाजरीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारताचा सर्वात मोठा वाटा (४२ टक्के) आहे. बाजरीचे सुधारित व संकरित वाण कोणते सविस्तर पाहूया. 

सुधारीत वाण
१) फुले आदिशक्ती

पिकाचा कालावधी (दिवस) : ८० ते ८५
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : ३२ ते ३४
वाणांची वैशिष्ट्ये : कणीस घट्ट, दाणे ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, बीजोत्पादकासाठी फायदेशीर.

२) फुले महाशक्ती
पिकाचा कालावधी (दिवस) : ८५ ते ९०
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : २८ ते ३०
वाणांची वैशिष्ट्ये : कणीस घट्ट, दाणे ठोकळ, गोलाकार व राखी रंगाचे, अधिक लोहयुक्त, गोसावी रोगास प्रतिकारक्षम.

३) एबीएच-१२००
पिकाचा कालावधी (दिवस) : ८० ते ८५
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : ३२ ते ३५
वाणांची वैशिष्ट्ये : अधिक लोहयुक्त, कणीस घट्ट, दाणे ठोकळ गोलाकार राखी रंगाचे.

४) एबीएच-१२६९
पिकाचा कालावधी (दिवस) : ८५ ते ८८
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : ३३ ते ३५
वाणांची वैशिष्ट्ये : अधिक लोहयुक्त, गोसावी रोगास प्रतिकारक्षम, कणीस घट्ट, दाणे टपोरे.

सुधारीत वाण
१) धनशक्ती

पिकाचा कालावधी (दिवस) : ७४ ते ७८
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : १९ ते २२
वाणांची वैशिष्ट्ये : कणीस घट्ट, दाणे टपोरे व राखी रंगाचे, लोहाचे प्रमाण अधिक, गोसावी रोगास प्रतिकारक्षम.

२) समृद्धि (एआयएम पी-९२९०१)
पिकाचा कालावधी (दिवस) : ८५ ते ९०
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : २० ते २५
वाणांची वैशिष्ट्ये : भाकरीची गुणवत्ता उत्तम, दाण्याचा रंग हिरवा व टपोरा, केवडा रोगास प्रतिकारक वाण व अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

३) परभणी संपदा (पीपीसी-६)
पिकाचा कालावधी (दिवस) : ८५ ते ९०
उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टरी) : २५ ते ३०
वाणांची वैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक वाण, भाकरीची गुणवत्ता उत्तम, उत्तम फुटवे, अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

अधिक वाचा: अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

Web Title: Which improved and hybrid varieties give higher yield in pearl millet crop? Read in detail