Lokmat Agro >स्मार्ट शेती > फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर

फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर

What is the right time to cultivation of fruit crops? What are the popular varieties of fruit crops? Read in detail | फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर

फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती? फळपिकांच्या पॉप्युलर जाती कोणत्या? वाचा सविस्तर

Falbag Lagwad आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे? आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का?

Falbag Lagwad आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे? आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का?

शेअर :

Join us
Join usNext

आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे? आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? आपल्या हवामानात कोणत्या प्रकारची फळझाडे येऊ शकतील? ह्याचा अभ्यास फळबाग लागवडीपूर्वी करणे गरजेचे आहे.

फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
-
खात्रीशीर चांगला पाऊस झाल्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीस जून महिना किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
- अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाड लागवड करू नये.
- पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली फळझाडे चांगली समाधानकारक वाढतात.
- काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात.
- जून-जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ भक्कम जोमाने होते.

फळबाग लावताना वाणांची निवड
-
भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातीची निवड करावी.
- आपल्या भागासाठी शिफारशीत असावी.
- कीड व रोगास प्रतिकारक्षम असावी.

फळपिके आणि त्यांच्या जाती
१) आंबा : केशर, हापूस, रत्ना, तोतापुरी, नीलम.
२) डाळिंब : भगवा, सुपर भगवा.
३) पेरु : सरदार एल-४९, ललित, अलाहाबाद सफेद, श्वेता.
४) सीताफळ : बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी.
५) आवळा : कृष्णा, कांचन व निलम.
६) चिंच : पीकेएम-२६३, प्रतिष्ठान, अकोला स्मृती.
७) लिंबू : साई सरबती, फुले सरबती, प्रमालिनी, विक्रम, पीडीकेव्ही लाईम.
८) मोसंबी : काटोल गोल्ड, न्यूसेलर, फुले मोसंबी.
९) संत्रा : नागपुर संत्रा, नागपूर सीडलेस.
१०) जांभूळ : स्थानिक, कोकण बहाडोली.
११) चिकू : कालीपत्ती, क्रिकेटबॉल.
१२) अंजीर : दिनकर, फुले राजेवाडी.

अधिक वाचा: मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे टॉप ५ वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर

Web Title: What is the right time to cultivation of fruit crops? What are the popular varieties of fruit crops? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.