Lokmat Agro >स्मार्ट शेती > सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या?

सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या?

What are the top three highest yielding varieties of Custard Apple? | सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या?

सिताफळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप तीन जाती कोणत्या?

Sitafal Jati सिताफळामध्ये प्रामुख्याने ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत परंतु लागवडीसाठी अनोना स्कायमोसा या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत.

Sitafal Jati सिताफळामध्ये प्रामुख्याने ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत परंतु लागवडीसाठी अनोना स्कायमोसा या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सिताफळ हे उष्णकटिबंधातील फळझाड असल्याने उष्ण व कोरडे हवामान आणि सौम्य स्वरूपाचा हिवाळा मानवतो सिताफळाच्या योग्य वाढीसाठी ३० ते ४० अंश सें.ग्रे तापमानाची, ५०० ते ६०० मिलिमीटर पावसाची गरज असते.

फळधारणेच्या वेळी ८०% पेक्षा जास्त आद्रतायुक्त हवामानाची गरज असते. फळे पिकांना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी वाढते. अशा प्रकारचे हवामान या पिकास जरी लागत असले तरी पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागात उन्हाळ्यात हे बिगर हंगामी पीक येत असल्याने सध्या जुलै ते ऑगस्टमध्ये बाजारात फळे येतात. मुख्य हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत चालतो.

जातीची निवड
सिताफळामध्ये प्रामुख्याने ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत परंतु लागवडीसाठी अनोना स्कायमोसा या प्रकारातील जाती उपलब्ध आहेत

१) फुले पुरंदर
- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी २०१४ मध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे.
- यांनी या जातीची फळे आकर्षक व आकाराने मोठे असून वजन ३६० ते ३८८ ग्रॅम आहे.
- झाडावरील फळांची संख्या ११८ ते १५४ एवढी आहे.
- फळातील गर घट्ट, रवाळ आणि स्वादिष्ट असून गराचे प्रमाण ४५ ते ४८% आहे.
- फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण २२ ते २४ टक्के आहे एवढे असते.
- या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गरातील पाकळ्या पांढऱ्याशुभ्र आणि संख्येने अधिक असल्याने या जातीच्या फळांना गरासाठी मागणी आहे.
- फळातील बियांची संख्या ३७ ते ४० एवढी आहे. अशा विविध गुणधर्मामुळे सध्या या जातीची लागवड महाराष्ट्रात वाढत आहे.

२) बाळानगर
- ही जात आंध्रप्रदेशातील संशोधन केंद्र येथे विकसित केलेली असून फळांचे सरासरी वजन २६६ ग्रॅम व गराचे प्रमाण ४८% आहे.
- प्रत्येक झाडापासून ४० ते ६० फुळे मिळतात.
- फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण २७ टक्के असून बियांचे प्रमाण ३.९५% आहे.

३) अर्कासहन
- ही संकरित जात भारतीय बागवानी संस्था बंगलोर, कर्नाटक येथून विकसित केलेली आहे.
- फळे व आकर्षक गोल, रंग फिकट हिरवा, डोळे पसरट चपटे असतात.
- फळाचे वजन ४०० ते ५०० ग्रॅम गराचे प्रमाण ४८% आणि विद्राव्य घटकांचे प्रमाण ३१ टक्के असल्याने खाण्यास फारच गोड असतात.
- बियांची संख्या फारच कमी असून लहान असतात.
- फळांच्या दोन डोळ्यांमध्ये अंतर कमी असल्याने पिठ्या ढेकुण या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळतो.
- फळे अधिक काळ टिकतात.

अधिक वाचा: Coconut Cultivation नारळ लावताय; लागवडीसाठी कसा भराल खड्डा

Web Title: What are the top three highest yielding varieties of Custard Apple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.