Lokmat Agro >स्मार्ट शेती > पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज?

पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज?

Tourism Department provides concessions for women farmers to set up agritourism businesses; How to apply? | पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज?

पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी कृषी पर्यटन व्यवसाय उभा करण्यासाठी सवलत; कसा कराल अर्ज?

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत दि. १९ जुन २०२३ नुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत दि. १९ जुन २०२३ नुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत दि. १९ जुन २०२३ नुसार महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रीत/लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

१) महिला उद्योजकता विकास.
२) महिलांकरिता पायाभुत सुविधा.
३) महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य.
४) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने/सवलती.
५) प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.

पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती
या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणीकरीता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने रू. १५ लक्ष पर्यंतच्या मयदित कर्ज मंजूर केलेल्या महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२% च्या मयदित) कर्ज परतफेड किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रू. ४.५० लक्ष मयदिपर्यंत जे आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात खालील अटींच्या अधीन राहून अदा करेल.
१) पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असला पाहिजे.
२) महिलांच्या मालकीच्या व्यवसायामध्ये ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
३) पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
४) लाभार्थीचे कर्ज खाते आधार लिंक असले पाहिजे.
५) कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे.
६) लाभार्थी, पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक महाराष्ट्रात स्थित असणे आवश्यक.

पर्यटन व्यवसाय स्वरूप
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. कॅरॅव्हॅन, बिचशेंक, साहसीपर्यटन (जमीन व हवाजल), पर्यटकसुविधाकेंद्र, कृषीपर्यटनकेंद्र, होमस्टे, निवास व न्याहरी, रिसॉर्ट, मोटेल, हाऊसबोट, टेंट, ट्रीहाऊस व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, पॉडस, महाभ्रमण, रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्टफुड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी, टुर ऑपरेटर, ट्रव्हलएजंट, टुर मार्गदर्शक, क्रुज, टुर अॅन्डट्रॅव्हलएजंसी, आर्ट अँड क्राफ व्हिलेज, टुरिस्ट ट्रास्पोटर्स ऑपरेटर, हाऊसबोट, ई व्हेहिकल्स रिक्षा मोटरसायकल बस व इतर चारचाकी वाहणे, आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडीकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेद योगा केंद्र, हॅन्डक्राफट्स, सोव्हिनिअर शॉप, आर्ट अॅन्ड कल्चर, स्थानिक उत्पादनाची विक्री केंद्रे, धार्मिक स्थळीनर्माल्य, प्रसाद विक्री करणारी मान्यता प्राप्त दुकाने, विविध खादयपदार्थ विक्रेते, इव्हेंटमॅनेजमेंट व इतर पर्यटन व्यवसाय प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी सूचना
१) विहित नमुना अर्ज वेबसाईटवर उपलब्ध.
२) www.gras.mahakosh.gov.in/echallan/ या लिंक वर रू. ५०/- प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती. (अनिवार्य)
३) अर्जदाराचा पासपोर्ट फोटो (JPEG. format) (अनिवार्य)
४) व्यवसाय महिलेच्या मालकी हक्काचा असल्याचे प्रमाणित करणारे प्रतिज्ञापत्र रू. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे साक्षांकित. (अनिवार्य)
५) ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र) (या पैकी एक अनिवार्य)
६) वैयबितक आधार कार्ड (अनिवार्य)
७) पॅन कार्ड (अनिवार्य)
८) आधारलिंक बँक खात्याचे पासबुक छायांकित प्रत/रद्द केलेला चेक (अनिवार्य)
९) पर्यटन व्यवसायाच्या पत्त्याचा पुरावा (उद्योग नोंदणी/बीज बिल/दुकान आणि स्थापना परवाने) (या पैकी एक अनिवार्य)
१०) पर्यटन केंद्र/व्यवसाय/उद्योगांची मालकी दस्तऐवज महिला अर्जदाराच्या नावावरील ७/१२ उतारा/प्रॉपर्टी कार्ड/८-अ नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार (आवश्यकतेनुसार)
११) अन्न व औषध प्रशासन परवाना (आवश्यकतेनुसार अनिवार्य)
१२) पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी/परवाना/कागदपत्रे उदा. निधी पोर्टल नोंदणी/पर्यटन संचालनालय नोंदणी/पर्यटन बिकास महामंडळाकडे नोंदणी प्रमाणपत्र प्रत (व्यवसाय नुसार अनिवार्य)
१३) प्रकल्प संकल्पना संक्षिप्त माहिती ५०० शब्द (एक पान अनिवार्य)
१४) जीएसटी क्र. GST No. (आवश्यकतेनुसार)
उपरोक्त नुसार विहित नमुन्यानुसार online अर्ज व कागदपत्रे योग्य आढळल्यास पर्यटन संचालनालयाकडून सशर्त हेतू पत्र (Letter of Intent) online दिले जाईल.

पर्यटन विभागाकडून कर्ज परताव्याच्या अटी व शर्ती
१) पर्यटन संचालनालयाकडून प्राप्त सशर्त हेतू पत्र (Letter of Intent) च्या आधारक लाभार्थ्यांनी बँकेकडून कर्ज मंजूर घ्यावे.
२) अर्जदार महिलेने नियमित कर्ज परतफेड करणे आवश्यक, हप्ता भरल्या नंतर व्याजाची रक्कम (१२% मर्यादेत) आधार लिंक खात्यात पर्यटन संचालनालयामार्फत जमा करण्यात येईल.
३) पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करावे.
४) व्याजाच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क/फी अदा केली जाणार नाही.
५) कर्ज देणारी बँक.
अ) महाराष्ट्रामध्ये स्थित असणे आवश्यक, ब) CBSC प्रणालीयुक्त (CORE Banking Solution) All Branches need to be interconnected, क) RBI च्या नियमाअंतर्गत कार्यरत.
६) कर्ज घेतांना क्रेडीट गॅरंटी स्किममध्ये सहभागी होणे बंधनकारक.

अधिक माहितीसाठी संपर्क
दुरध्वनी क्र: ८०८००३५१३४/०२०-२९९००२८९
कार्यलयीन वेळेत सकाळी १० ते दुपारी ०६ पर्यंत.

अधिक वाचा: राज्यातील या प्रमुख सहा धरणांचा पाणीसाठा आता वाढणार, शासन आखतंय हे नवे धोरण

Web Title: Tourism Department provides concessions for women farmers to set up agritourism businesses; How to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.