Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

This soybean variety developed by Akola Agricultural University has become popular in a short time; It is giving the highest yield | अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

अकोला कृषी विद्यापीठाचा सोयाबीनचा हा वाण अल्पावधीतच लोकप्रिय; देतोय सर्वाधिक उत्पादन

pdkv amba soybean डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेला हा सोयाबीनचा वाण नवीन असून सुद्धा ही वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

pdkv amba soybean डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेला हा सोयाबीनचा वाण नवीन असून सुद्धा ही वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेला हा सोयाबीनचा वाण नवीन असून सुद्धा ही वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

पिक अवर्षण काळात किंवा जास्त पर्जन्यमान असुन सुद्धा ह्या वाणांनी चांगले उत्पादन देवून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरविण्यास एकाप्रकारे मदतच केली आहे.

पिडीकेव्ही अंबा (एएमएस १००-३९) वाणाची वैशिष्ट्ये
◼️ लवकर परिपक्व होतो.
◼️ जास्त उत्पादन क्षमता.
◼️ तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्यांचे वजन जास्त.
◼️ या वाणात तेल व प्रथिनांचे प्रमाण सुध्दा इतर वाणांपेक्षा जास्त आहे.
◼️ सदर वाण हा बदलत्या हवामानात तग धरणारा वाण आहे.
◼️ शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिका मध्ये सदर वाणाने प्रचलित वाणांपेक्षा २७% जास्त उत्पादकता नोंदविली आहे.
◼️ राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांकरीता प्रसारीत.
◼️ प्रसारण वर्ष: २०२१, अधिसूचना वर्ष २०२१.
◼️ जास्त उत्पादन क्षमता (सरासरी उत्पादकता: २८-३० क्विं./हे)
◼️ लवकर परिपक्व होणारे वाण (९४-९६ दिवस)
◼️ मुळकुज/खोडकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक.
◼️ प्रचलित वाणांपेक्षा तेलाचे व प्रथिणाचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त.
◼️ परीपक्तेनंतर १०-१२ दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

सदर सोयाबीनचे वाण नवीन असून सुद्धा अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

अधिक वाचा: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणी अगोदर करायला विसरू नका ह्या १० गोष्टी

Web Title: This soybean variety developed by Akola Agricultural University has become popular in a short time; It is giving the highest yield