Lokmat Agro >स्मार्ट शेती > हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

This is a simple way to store turmeric rhizomes to make them last longer; read in details | हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते.

Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. २ दिवसांनी कंदाची मोडणी करावी.

हळद बेण्याची साठवणूक करताना घ्यावयाची काळजी
◼️ हळद काढल्यानंतर जे बियाणे पुढील हंगामासाठी वापरायचे आहे ते बियाणे निवडून बाजूला काढावे.
◼️ बियाणेची निवड करताना किडग्रस्त, रोगयुक्त अथवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
◼️ साठवणुकीची जागा सावलीत वारा खेळेल अशा ठिकाणी असावी.
◼️ साठवणीकरता निवडलेले बेणे थोड्या उंचवट्यावर कोणाकार ढीग करून रचून ठेवावे.
◼️ त्यावर हळदीच्या पानांचा १० ते १५ सेंटीमीटर थर द्यावा. या पाल्यावरती किटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी.
◼️ पाला उन्हामध्ये सुकवून त्याचा वापर करावा, पाल्यावर गोणपाट टाकून ते भिजेल एवढे पाणी मारावे.
◼️ बेणे साठवणीचा कालावधी ७५ ते ९० दिवसांपर्यंत ठेवाल्यास सर्व बेण्यांचे डोळे फुगलेले दिसतात.
◼️ या साठवणीच्या कालावधीमध्ये सुरुवातीस ४५ ते ६० दिवस कोणतीही प्रक्रिया करू नये.
◼️ साधारणपणे लागवडीच्या ३० दिवस अगोदर ६ ते ८ दिवसांच्या अंतराने ढिगावरती पाणी मारावे.
◼️ या पद्धतीने बियाणे साठवणूक केल्यास गड्ड्यावर असणाऱ्या मूळ्या लवकर कुजतात आणि त्या गड्ड्यापासून त्वरित अलग करता येतात. असे मुळ्याविरहीत गड्डे बेणे लागवडीसाठी उत्तम समजले जाते.

जमिनीत खड्डा करून बियाणे साठवणे
◼️ ज्या ठिकाणी तापमान ४० अंश सें.च्या वरती जाते अशा ठिकाणी बियाणे खड्डा करून साठवावे.
◼️ ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटर पेक्षा खोल आहे व जी जागा उंच ठिकाणी आहे अशा सावलीच्या ठिकाणी १ मीटर खोलीचा व जरुरीप्रमाणे लांबी रुंदीचा खड्डा खोदावा. खड्डयाच्या तळाला ढाळ/उतार द्यावा.
◼️ खड्डयाच्या तळाशी ३ ते ४ इंच जाडीच्या विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा, त्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची धुरळणी करावी, त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा ६ ते ८ इंच इतक्या जाडीचा थर द्यावा.
◼️ खड्डयाच्या बाजूनेही तेवढ्याच जाडीच्या पाल्याचा थर द्यावा. 
◼️ बेण्याचा एक फूट उंचीचा थर झाला की पुन्हा थरावर किटकनाशक, बुरशीनाशक धुरळावे.
◼️ खड्डा ३ फूट इतक्या उंचीचा भरून घ्यावा त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर टाकावा. 
◼️ खड्डयामध्ये एक मीटर अंतरावर छिद्र पाडलेले अडीच ते तीन इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप टाकावेत.
◼️ त्यानंतर खड्डा गोणपाटाने झाकून घ्यावा पाऊस आल्यावर तेवढ्यावेळेपूरता प्लास्टिक कागदाने झाकून घ्यावा.

अधिक वाचा: उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

Web Title: This is a simple way to store turmeric rhizomes to make them last longer; read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.