करवंदातील आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे असलेली मागणी तसेच करवंदापासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार करता येत असल्यामुळे करवंद लागवडीवर भर देण्याची आवश्यकता आहे.
करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूप वर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळे जनावरे खात नाहीत.
करवंदाच्या ताज्या पिकलेल्या फळांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. तसेच फळांपासून चटणी, मुरांबा, जेली, करवंद सिरप, विविध प्रकारची लोणची तयार करता येतात.
करवंदामध्ये 'क' जीवनसत्व विपुल असते. तसेच त्यात मोठ्या प्रमाणावर लोह असते. त्यामुळे अॅनिमिया विकारावर ते अत्यंत गुणकारी आहे. करवंदापासून बनविलेल्या मद्यामध्ये १४.५ ते १५.० टक्के अल्कोहोल असते.
करवंदाचे झाड काटक असल्याने ते कोरड्या हवामानापासून उष्ण दमट हवामानात व कमी ते अति पावसाच्या प्रदेशात चांगले येते. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्यावर हे झाड वाढते.
करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते हे हलक्या मुरमाड तसेच कातळ असलेल्या जमिनीत ही चांगले वाढते.
बियांपासून रोपे तयार करून अभिवृद्धी करता येत असली तरी इच्छित जाती/प्रकाराच्या अभिवृद्धीसाठी गुटी किंवा जून फांद्यांच्या छाट कलमांद्वारे करणे चांगले.
गुटी कलमे जुलै महिन्यात तर मृतकाष्ठ कलमे सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तयार करावीत. मुळे लवकर व जलद फुटण्यासाठी आय.बी.ए, एम.ए. या संजीवाचे २,५०० ते ५,००० पी.पी.एम द्रावणाची प्रक्रिया उपयुक्त आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने 'कोकण बोल्ड' ही करवंदाची जात प्रसारित केली आहे. या जातीच्या झाडांना फळे मोठी व घोसाने लागतात. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण ९२ टक्के आहे.
चार दिवस फळे टिकतात. फळे गडद काळ्या रंगाची असून, त्याच्या प्रती १०० ग्रॅम गरात ३६१ मिली ग्रॅम 'क' जीवनसत्त्व आहे.
फळातील बिया मृदू असून, चाऊन खाता येतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
करवंदाची लागवड कुंपणासाठी आवश्य करावी. मात्र, लागवड करताना दोन रोपातील अंतर ९० सेंटिमीटर ठेवावे. सलग लागवड ३ ते ४ मीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी.
काढणी व उत्पादन◼️ करवंद कलमांच्या सभोवती तणांची वाढ होऊ नये म्हणून १५ सेंटिमीटर जाडीचे पालापाचोळ्याचे आच्छादन द्यावे.◼️ पाचव्या वर्षापासून दरवर्षी फळे काढणीनंतर मे-जून महिन्यांत फांद्यांची छाटणी करावी.◼️ करवंदाला फेब्रुवारी महिन्यात फुले येऊन एप्रिल ते जूनमध्ये फळे पक्व व काढणीस तयार होतात.◼️ पक्व फळे हाताने काढावीत. प्रती झाडास ३.५ ते ५ किलो फळांचे उत्पादन मिळते.◼️ कलमांची चांगली वाढ, अधिक उत्पादनासाठी खताची मात्रा द्यावी.
अधिक वाचा: राज्यातील 'या' प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दीड कोटी मिळणार; वाचा काय आहे निर्णय?
Web Summary : Karonda, rich in iron and vitamin C, effectively combats anemia. Its hardy nature allows cultivation in diverse climates and soil. Propagation through cuttings yields best results. Kokan Bold variety is popular. Good returns possible.
Web Summary : करौंदा, आयरन और विटामिन सी से भरपूर, एनीमिया से प्रभावी ढंग से लड़ता है। इसकी कठोर प्रकृति विभिन्न जलवायु और मिट्टी में खेती की अनुमति देती है। कटिंग के माध्यम से प्रचार सबसे अच्छा परिणाम देता है। कोंकण बोल्ड किस्म लोकप्रिय है। अच्छा रिटर्न संभव।