Lokmat Agro >स्मार्ट शेती > हळद पिक घेण्याचा विचार करताय? कधी व कशी कराल लागवड? जाणून घ्या सविस्तर

हळद पिक घेण्याचा विचार करताय? कधी व कशी कराल लागवड? जाणून घ्या सविस्तर

Thinking of growing turmeric? When and how to plant? Find out in detail | हळद पिक घेण्याचा विचार करताय? कधी व कशी कराल लागवड? जाणून घ्या सविस्तर

हळद पिक घेण्याचा विचार करताय? कधी व कशी कराल लागवड? जाणून घ्या सविस्तर

Halad Lagvad हळद लागवड करण्यासाठी योग्य वेळ १५ मे ते जूनचा पहिला आठवडा आहे. हळद पिकाच्या रोगमुक्त व कीडमुक्त उत्पादनासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

Halad Lagvad हळद लागवड करण्यासाठी योग्य वेळ १५ मे ते जूनचा पहिला आठवडा आहे. हळद पिकाच्या रोगमुक्त व कीडमुक्त उत्पादनासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

शेअर :

Join us
Join usNext

Halad Lagvad  हळद लागवड करण्यासाठी योग्य वेळ १५ मे ते जूनचा पहिला आठवडा आहे. हळद पिकाच्या रोगमुक्त व कीडमुक्त उत्पादनासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

हळद लागवड पूर्वनियोजन
◼️ पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हळद लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळे फोडून प्रती गुंठा २५० ते ४०० किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. इतर पिकांचे अवशेष व धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
◼️ हळदीची लागवड मे ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केल्यास चांगले उत्पादन मिळते.
◼️ हळदीची लागवड सरी वरंबा पध्दतीने करताना ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.
◼️ सरीच्या दोन्ही बाजूला दोन गड्ड्या मध्ये ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी.
◼️ रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास ९० सें.मी. ते १ मीटरच्या गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवून करावी.
◼️ हळद पिकास ३.७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १ किलो म्युरेट ऑफ पोटेश खते प्रति गुंठा लागवडीच्या वेळेस द्यावीत आणि नत्र खताची मात्रा २.५ किलो युरिया प्रति गुंठा तीन हप्त्यामध्ये विभागून लागवडीपासून दीड, तीन व साडेचार महिन्यांनी द्यावी.
◼️ हळदीच्या ओळीलगत चर घेवून त्यात खते टाकून मातीने झाकून घ्यावीत.
◼️ लागवडीसाठी जून, डोळे फुटलेले, मुळ्या विरहित मोठे गड्डे वापरावे.
◼️ किडीचा आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करावी.
◼️ यासाठी क्विनोलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.ली. १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावेत व या द्रावणात बियाणे १५ ते २० मिनिटे बुडवून घेवून सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावे.
◼️ साधारणतः २५ किलो बियाणे प्रती गुंठा लागते.
◼️ हळदीची लागवड करताना जमीन वाफसा स्थितीत असताना किंवा पाणी देवून करावी.

अधिक वाचा: अँटी हेलनेट तंत्राचा वापर करत माजी सैनिक वसंतराव यांनी केला उन्हाळी मिरची उत्पादनाचा विक्रम

Web Title: Thinking of growing turmeric? When and how to plant? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.