Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

These are the benefits of sowing with BBF Broad Bed Furrpws method | BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

बदलत्या नैसर्गीक स्थितीमुळे कधी कमी तर अधीक पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे हा धोका टाळण्यासाठी रुंद सरी वरंबा पध्दतीने (BBF) पट्टापद्धत पेरणी करावी त्यामुळे हमखास उत्पादन मिळते.

पिकाच्या होणाऱ्या नुकसानापासुन आपण सुरक्षीत राहतो. सोयाबीन पिकांच्या प्रत्येकी ४ किंवा ६ ओळी नंतर ४५ सें.मी. जागा सोडावी व डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडाव्यात.

BBF पेरणीमुळे होणारे फायदे
-
मुलस्थानी जलसंधारणाचा फायदा मिळतो.
- पाऊस कमी झाल्यास पाणी सरीमध्ये थांबुन मंदगतीने पिकास उपलब्ध होते व त्यासोबत अन्नद्रव्ये उपलब्ध होते.
- पाऊस जास्त झाल्यास सरीतून जास्तीचे पाणी निघुन जाते.
- टोकण पध्दतीच्या लागवडीचा फायदा मिळते.
- त्यामुळे प्रत्येक रोपाला वाढीसाठी मोकळी जागा मिळते.
- सेंद्रिय पदार्थ तयार करणाऱ्या जिवाणूंस चालना मिळते.
- बॉर्डर इफेक्ट मिळतो.
- परागीकरणास चालना मिळते.
- कॉर्बन डायऑक्साईडची उपयोगीता मिळते.
- किड रोग वाढीस प्रतिबंध होतो.
- बियाणे कमी लागते व उत्पादन खर्च कमी होते.
- पेरणीसाठी एकरी ८ किलो बियाणे बचत.
- पावसातील खंड आणि अतिपावसातही पिकांचे संरक्षण.
- मुलस्थानी जलसंधारणाकरीता उपयुक्त.
- उत्पादनात सरासरी एकरी ५ क्विं. पर्यंत वाढ.

अधिक वाचा: उन्हाळ्यात केलेल्या जमीन मशागतीचे हे आहेत चार फायदे

Web Title: These are the benefits of sowing with BBF Broad Bed Furrpws method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.