Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय?

भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय?

There is a possibility of armyworm infestation in paddy crop; should you take these measures to control it? | भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय?

भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता; नियंत्रणासाठी करा हे उपाय?

bhat lashkari ali सध्या भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रोपवाटिकेत खोडकिडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे.

bhat lashkari ali सध्या भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रोपवाटिकेत खोडकिडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे.

सध्या भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रोपवाटिकेत खोडकिडा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव निदर्शनास येत आहे.

सद्य परिस्थितीत पावसाने दिलेली उघडीप आणि वाढते तापमान या बाबी लष्करी अळीच्या वाढीस अनुकूल असल्याने या अळीचा उद्रेक काही ठिकाणी भातपीक क्षेत्रावर दिसत आहे.

नुकसानीची पद्धत
◼️ ह्या किडीचा रोपवाटिकेतही प्रादुर्भाव होतो.
◼️ ही कीड ज्याठिकाणी भातखाचरात पाणी नाही तेथे भाताच्या चुडामध्ये, जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते आणि रात्रीच्या वेळेस भात रोपांवर चढून अधाशाप्रमाणे लोंब्या कुरतडते.
◼️ यामध्ये लोंब्या खाण्यापेक्षा त्या कुरतडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भात शेतात दाण्यांचा सडा पडल्याचे दिसते.
◼️ ही कीड एका रात्रीत बऱ्याच क्षेत्रावरील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
◼️ तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कसे कराल व्यवस्थापन?
◼️ ज्या भातशेतीमध्ये पाण्याची उपलब्धतता असेल, अशा ठिकाणी प्रादुर्भावित भात शेतामध्ये पाणी बांधून ठेवावे.
◼️ जेणेकरून अळ्या जमिनीत किंवा चूडामध्ये न लता रोपांवर आल्याने पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतील.
◼️ तेव्हा त्याकरीता भातशेतीमध्ये पक्षी थांबे उभारावेत.
◼️ ज्या भातशेतीमध्ये या किडीचा उद्रेक झालेला असेल, अशा ठिकाणी भातशेतीच्या भोवती चर खोदून पाणी भरून ठेवावे म्हणजे अळ्यांचे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये स्थलांतर होणार नाही.
◼️ या किडीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक मोहीम राबविल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील.

अधिक वाचा: आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर

Web Title: There is a possibility of armyworm infestation in paddy crop; should you take these measures to control it?