आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्या फवारण्या घ्याव्यात.
आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी.
पहिली फवारणी
मोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी. @ ९ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
दुसरी फवारणी
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहोर फुटण्याच्या अवस्थेत) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. @ ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
तिसरी फवारणी
दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. @ ३ मि.ली. प्रति १० लिटर पाणी किंवा बुप्रोफेझीन २५% ई.सी. @२० मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
चौथी फवारणी
तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी थायमेथॉक्साम २५% डब्ल्यू.डी.जी. @ १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारावे.
पाचवी फवारणी
चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी डायमेथोएट ३०% ई.सी. @ १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. @ ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.
सहावी फवारणी
तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी पेक्षा जास्त असल्यासच, पाचव्या फवारणीत वापरलेले नसलेले कीटकनाशक फवारावे.
महत्वाचे
मोहोर सुरू झाल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांची फवारणी टाळावी. फवारणी अत्यावश्यक असल्यास परागीभवनाच्या कालावधीत फवारणी करू नये, जेणेकरून परागीभवन करणाऱ्या किडींना कोणतीही हानी होणार नाही.
- डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
अधिक वाचा: थंडीत 'ह्या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात; होऊ शकतो हेमोरेजिक स्ट्रोक
