हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरापेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्याला बाजारात मोठी मागणी असते.
देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत.
यापैकी विजय, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात.
या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.
फुले विक्रम Phule Vikram
◼️ फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.
◼️ कालावधी : १०५ ते ११० दिवस
◼️ उत्पन्न
- जिरायत प्रायोगीक उत्पन्न १६-१८
- सरासरी उत्पन्न १६
- बागायत प्रायोगीक उत्पन्न ३५-४०
- सरासरी उत्पन्न २२
- उशिरा पेर प्रायोगीक उत्पन्न २०-२२
- सरासरी उत्पन्न २१
◼️ वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पध्दतीने/कंबाईन हार्वेस्टरने काढणी करण्यास उपयुक्त.
◼️ अधिक उत्पादन क्षमता.
◼️ मर रोग प्रतिकारक.
◼️ जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य.
◼️ मध्यम आकाराचे दाणे.
◼️ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, द.राजस्थान, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरीता प्रसारीत.
अधिक वाचा: तुमच्या शेतातील मातीचे आरोग्य चांगले आहे हे कधी व कसे समजावे? जाणून घ्या सविस्तर
