ज्या क्षेत्रामधील पावसाचे पडणारे पाणी भौगोलिक परिस्थितीनुसार नैसर्गिकरीत्या वाहत येऊन एका स्रोताच्या रूपाने (ओढा, नदी, इत्यादी) एका ठिकाणाहून वाहते त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.
एखाद्या प्रवाहास प्रमाणबध्द मानून त्यामध्ये ज्या क्षेत्रामधून पाणी वाहत येऊन मिळते त्या संपूर्ण क्षेत्रास त्या प्रवाहाचे पाणलोट क्षेत्र म्हणतात.
पाणलोट क्षेत्राचे प्रकार व आकारभूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जल प्रवाहास त्याचे स्वतःचे वेगळे पाणलोट क्षेत्र असते. असे अनेक लहान लहान पाणलोट क्षेत्र एकत्र आल्यावर त्यांचे मोठे पाणलोट क्षेत्र तयार होते व असे अनेक पाणलोट प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखादया नदीस मिळतात तेव्हा त्यांचे नदीखोरे तयार होते.
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रनिहाय वर्गीकरणसूक्ष्म पाणलोट क्षेत्र (Micro Watershed) - १० हेक्टरपर्यंत.लघु पाणलोट क्षेत्र (Mini Watershed) - २०० हेक्टरपर्यंत.उप पाणलोट क्षेत्र (Sub Watershed) - ४००० हेक्टरपर्यंत.नदी खोरे (River Valley) - याला क्षेत्र मर्यादा नाही.
पाणलोट क्षेत्राचे गुणधर्मपाणलोट क्षेत्र विकासाचा आराखडा तयार करण्याआधी त्या पाणलोट क्षेत्राचे सर्व गुणधर्म तपासणे आवश्यक आहेत. पाणलोट क्षेत्र तीन प्रकारांत विभागले जातात, भुरुपीय, पर्जन्यविषयक आणि मृदाभौतिक (Geophysical).
पाणलोट क्षेत्र विकासाचा आराखडा तयार करण्यापुर्वी त्या पाणलोट क्षेत्राचे खालील सर्व गुणधर्म तपासणे आवश्यक आहे.१) आकारमान २) आकार ३) उतार ४) जमिनीवरील आच्छादन ५) प्रवाह घनता ६) जमीनीचा उपयोग ७) जलअंतःसरण ८) मातीचा प्रकार ९) भूगर्भ१०) मातीची खोली ११) पर्जन्यमान १२) पर्जन्यकाल १३) वितरण १४) वारंवारता १५) पर्जन्यघनता
अधिक वाचा: जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी