Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा

Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा

Mug Variety; Choose an this improved variety of mug and get a highest yield | Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा

Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा

मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी.

मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी.

शेअर :

Join us
Join usNext

मूग या कडधान्यवर्गीय पिकामध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये टपोरे दाणे असलेले, रोग प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणारा वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहे.

मुगाच्या सुधारीत जाती
१) कोपरगांव
-
हा वाण म.फु.कृ.वि. राहुरी येथुन प्रसारीत झाला.
- हे वाण ६५ ते ७० दिवसामध्ये तयार होते.
- मर व करपा (ब्लाईट) पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे.
- मध्यम आकाराचा हिरवा रंगाचा व चमकदार असुन १०० दाण्याचे वजन ३ ते ३.२ ग्रॅम असते.
- या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते १० किं/हे. मिळते.

२) बीएम २००२-१
-
हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २००५ मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.
- हे वाण ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ७-९ क्विंटल उत्पादन मिळते.
- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ३.७५ ग्रॅम एवढे आहे.
- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.
- शेंगा या टोकदार व केसाळ असून जमिनीकडे झोपळलेल्या असतात.
- हे वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.

३) बीएम २००३-२
-
हा वाण कृ.सं.कें., बदनापूर (व.ना.म.कृ.वि. परभणी) येथून २०१० मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला.
- हे ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ८-१० क्विंटल उत्पादन मिळते.
- या वाणाचे दाणे हे टपोरे हिरवे असून १०० दाण्याचे वजन ४.५० ग्रॅम एवढे आहे.
- या वाणाचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे हे वाण काढणीस एकाच वेळी येते.
- शेंगा या लांब असून दाणे हे मोठ्या आकाराचे व चमकदार असतात तसेच हा वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे.

४) फुले मुग २
-
हा वाण ६०-६५ दिवसात येणारे असुन त्याचे उत्पादन १०- १२ किंटल/हे. असे आहे.
- या वाणाचे दाणे मध्यंम आकाराचे व हिरव्या रंगाचे आहे.
- हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य असुन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी प्रसारीत केलेला आहे.

५) पी.के.व्हि. ए.के.एम ४
-
हा वाण डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांनी प्रसारीत केला आहे.
- अधिक उत्पादन देणारा, मध्यंम आकाराचे दाणे असणारा, एकाच वेळी पक्वता येणारा आहे.
- बहुरोग प्रतिकारक आहे.
- संपुर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे.
- हा वाण ६५-७० दिवसात येणारा आणि १२/१५ क्विं./हे. उत्पादन देणारा आहे.

अधिक वाचा: Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Web Title: Mug Variety; Choose an this improved variety of mug and get a highest yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.