Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Tur Variety; What are the popular varieties of Tur with high yield? | Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

Tur Variety तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Tur Variety तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारात कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून अधिक उत्पादन मिळत राहण्यासाठी विविध पीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्व प्राप्त होत आहे.

तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

१) बीडीएन - २०१३-४१ (गोदावरी)
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २२-२४
वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, शेंगाच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन देणे आवश्यक तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.

२) बी डी एन - ७११
कालावधी दिवस : १५०-१५५
उत्पादन क्वि./हे. : १६-१८
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग पांढरा कमी कालावधीत तयार होणारा तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.

३) बी एस एम आर - ७३६
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.

४) बी एस एम आर - ८५३ (वैशाली)
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.

५) बी डी एन - ७१६
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २०-२२
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, अधिक उत्पादन क्षमता.

६) बी डी एन - २
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१५
वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, मररोग प्रतिकारक, गुजरात मध्ये लोकप्रिय वाण.

७) बी डी एन - ७०८ (अमोल)
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१७
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लाल दाणा कोरडवाहुसाठी योग्य.

८) विपुला
कालावधी दिवस : १४५-१६०
उत्पादन क्वि./हे. : १४-१६
वैशिष्ट्ये : तांबड्या रंगाचा दाणा, मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम.

९) फुले राजेश्वरी
कालावधी दिवस : १४०-१५०
उत्पादन क्वि./हे. : १८-२३
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लवकर पक्वता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे.

१०) ए के टी - ८८११
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग लाल.

११) पी के व्ही तारा
कालावधी दिवस : १७०-१८०
उत्पादन क्वि./हे. : १९-२२
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग तांबडा.

१२) आयसीपीएल - ८७११९
कालावधी दिवस : १८५-१९०
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक लाल दाणा.

अधिक वाचा: Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

Web Title: Tur Variety; What are the popular varieties of Tur with high yield?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.