Vegetbale Farming : पीक उत्पादनाच्या दृष्टीने भाजीपाला पिकांना (Bhajipala Pike) उन्हाळी हंगामात पाण्याच्या गरजेनुसार पाणी नेमके किती द्यावे? हे समजून घेणे आवश्यक आहे. नेमक्या पाळ्यातून पाणी विभागून द्यावे तसेच ते केव्हा द्यावे? हे लक्षात घेणे गरजेचे असते. पिकाचा कालावधी, प्रकार, जमिनीचा प्रकार, हा गोष्टींवर पिकाची पाण्याची गरज अवलंबून असते.
उन्हाळी भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन
कोबी, फ्लॉवर व पालेभाज्यापाण्याचा ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे या भाज्यांना कमी अंतराने पाणी पुरवठा करावा लागतो. याउलट मिरची, वांगी, गवार, घेवडा, वाल इत्यादी भाज्या पाण्याचा ताण सहन करू शकतात.
भाजीपाला पिकासाठी पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर ठरविताना पिकांच्या वाढीच्या अवस्था लक्षात होणे गरजेचे असते. उन्हाळी हंगामात बियांच्या उगवणीच्यावेळी फुले आणि फळधारणा होताना आणि फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा तुटवडा पडू देऊ नये.
उन्हाळ्यात कोरडी हवा आणि अधिक तापमानामुळे बाष्पीभवन व पानांवाटे होणारे पर्णोत्सर्जन खूपच वाढते. त्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात आणि कमी अंतराने पाणी दयावे लागते. पिकाला पाणी देताना जमिनीचा मगदूर, खोली, पोत, घडण, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण या गोष्टींचा विचार करून पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी जास्त करावे लागते. उथळ जमिनीत पाणी लवकर द्यावे लागते. तर माध्यम किंवा भारी जमिनीत दोन पाळ्यांतील अंतर जास्त ठेवावे लागते.
भेंडी पिकास आवश्यकतेनुसार पाच ते सहा दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फळे येण्याच्या सुमारास पाण्याचा ताण पडू देवू नये. उन्हाळी हंगामात वांग्याच्या पिकास सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्याने फुलगळ होते. मिरची पिकाला उन्हाळी हंगामात सहा ते बारा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कांदा पोसायला लागल्यावर पाण्याचा ताण कमी पडू देऊ नये, कांदा पिकाला उन्हाळी हंगामात सात ते आठ दिवसाच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवानिवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ
अन् याबाबतचा विडियो पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
Vegetable Farming : पाण्याची सोय जेमतेम, मग उन्हाळी भाजीपाला पिकांचे असं करा व्यवस्थापन
Vihir Satbara Nond : तुमच्या सातबाऱ्यावर विहीर अन् बोअरवेलची नोंद घरबसल्या करा, अशी आहे प्रक्रिया