Vegetable Farming : खरीप टोमॅटो. वांगी, मिरची, भेंडी, गवार, व वेलवर्गीय भाजीपाला तसेच कोबी व फ्लॉवर पिकामध्ये खांदणी करून झाडांना भर लावावी.
सद्यस्थितीतील व्यवस्थापन
- जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांच्या बुंध्याजवळची माती वाहून गेली असल्यास, रोपांना मातीची भर द्यावी.
- वेगवान वाऱ्यांपासून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेलींना आधार द्यावा.
- ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
- नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.
- पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० दिवसांच्या अंतराने घ्यावी.
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये पाने खाणारी अळी, तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
त्यांच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन २ मिली किंवा डायमिथोएट १.५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
गरजेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
नाशिक जिल्ह्यासाठी हवामान सल्ला
- पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दि. १० ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान तुरळक हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
- आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील.
- तसेच कमाल तापमान २६-२७ डिग्री सें. व किमान तापमान १८ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
- तसेच वाऱ्याचा वेग ३-७ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी