Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > नाशिकमध्ये अवकाळी पाऊस, कांदा, गहू, द्राक्ष पिकांसाठी महत्वाचा कृषी सल्ला 

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस, कांदा, गहू, द्राक्ष पिकांसाठी महत्वाचा कृषी सल्ला 

Latest news Unseasonal rains in Nashik, important agricultural advisory for onion, wheat, grape crops | नाशिकमध्ये अवकाळी पाऊस, कांदा, गहू, द्राक्ष पिकांसाठी महत्वाचा कृषी सल्ला 

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस, कांदा, गहू, द्राक्ष पिकांसाठी महत्वाचा कृषी सल्ला 

Agriculture News : जिल्ह्यामधील येवला व नांदगाव या तालुक्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले.

Agriculture News : जिल्ह्यामधील येवला व नांदगाव या तालुक्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले.

नाशिक : जिल्ह्यामधील येवला व नांदगाव या तालुक्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव व पिक अशक्त होऊन अजून जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील.

कांदा-

  • कांदा शेतात पाणी साचून राहू देऊ नका, अतिरिक्त पाणी काढून टाकावे. 
  • कांदा पिकामध्ये अचानक पाऊस पडल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा (करपा) तसेच फुल किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  • यासाठी अॅझाक्सीस्ट्रोबीन ०.५ मि. लि. प्रति लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. 
  • तसेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील १.५ मि. लि. प्रति लिटर स्टीकरसह फवारावे..
  • यानंतर दुसरी फवारणी ३ ते ४ दिवसानंतर १३:००:४५ ची ५ ग्रॅम प्रति लिटर अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणांची २.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रितपणे फवारणी करावी. 
  • अशा अवस्थेत पिकास जमिनीतून एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

गहू -

  • गहू पिकात पाणी साचलेले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा
  • शक्य असल्यास पाणी कमी ठेवा, पुढील पाणी देणे टाळा.
  • पानांवर पिवळट-तपकिरी/केशरी पावडरसारखे डाग (तांबेरा रोगासाठी तसेच पानांच्या कडा किंवा मध्यभागी तपकिरी, जळल्यासारखे डाग (करपा) दिसल्यास प्रोपिकोनाझोल २५ टक्के इसी १ मिली / लिटर किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के इसी १ मिली / लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी.

द्राक्षे -

  • अवकाळी पाऊस पडल्यानंतर द्राक्ष पिकामध्ये डाऊनी मिल्ड्यू / पावडरी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव
  • वाढण्याची शक्यता असल्याने पाऊस थांबताच डाऊनी मिल्ड्यू साठी मेटालॅक्सिल मॅन्कोझेब २५ ग्रॅम/२० लिटर पाणी फॉसेटिल-अल २० ग्रॅम / १० लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 
  • पावडरी मिल्ड्यू साठी हेक्साकोनाझोल ५ टक्के इसी 10 मिली/10 लिटर किंवा टेबुकोनाझोल २५ टक्के इसी 10 मिली/10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. 

 

वेलवर्गीय भाजीपाला
वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भुरी आणि अॅन्थ्रैक्नोज नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझॉल १ मि. लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करून घ्यावी.

- विशाल जी चौधरी, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), केव्हीके मालेगाव 

Web Title : नाशिक में बेमौसम बारिश: प्याज, गेहूं, अंगूर के लिए कृषि सलाह

Web Summary : नाशिक में बेमौसम बारिश से फसलों को नुकसान। पानी का प्रबंधन करें, प्याज, गेहूं, अंगूर के लिए फफूंदनाशक स्प्रे करें। स्वस्थ उपज के लिए विशेषज्ञों की सलाह का पालन करें।

Web Title : Nashik Unseasonal Rain: Crucial Agricultural Advice for Onion, Wheat, Grapes

Web Summary : Unseasonal rains in Nashik damage crops. Manage water, spray fungicides for onion, wheat, grapes. Follow experts' advice for healthy yields.