Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

latest news Trichoderma Use in Crops : Not chemical, biological solution! Protect crops with Trichoderma fungus Read in detail | Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

Trichoderma Use in Crops : रासायनिक नव्हे, जैविक उपाय! ट्रायकोडर्मा बुरशीने करा पिकांचे संरक्षण वाचा सविस्तर

Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो. (Trichoderma use in crops)

Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो. (Trichoderma use in crops)

शेअर :

Join us
Join usNext

Trichoderma Use in Crops : पिकांना रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रायकोडर्मा ही एक प्रभावी जैविक बुरशी आहे. ही 'मित्र बुरशी' जमिनीत रोगकारक बुरशींचा नायनाट करून मुळांची वाढ सुधारते आणि पिकांच्या उत्पादनात भर घालते. (Trichoderma Use in Crops)

तूर, हळद, आले, संत्रा, पेरू आणि पपई अशा पिकांत ट्रायकोडर्माचा वापर केल्यास मर, मुळकुज, कंदकुज आणि इतर बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.(Trichoderma Use in Crops)

मित्र बुरशी जी तुमच्या पिकांना रोगांपासून वाचवते आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखते. ट्रायकोडर्मा (Trichoderma). हे जैविक बुरशीनाशक पिकांचे आरोग्य सुधारते, मुळांना संरक्षण देते आणि उत्पादन वाढवण्यास मदत करते. हे पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि रासायनिक बुरशीनाशकांना एक उत्कृष्ट पर्याय आहे.(Trichoderma Use in Crops)

विविध पिकांमध्ये ट्रायकोडर्माचा वापर

तूर (Red Gram / Pigeon Pea)

तूर पिकात मर व मुळकुज रोग टाळण्यासाठी पेरणीपूर्वी १० ग्रॅम किंवा १० मिली ट्रायकोडर्मा व्हीरीडी प्रति किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करावी.
मुसळधार पाऊस किंवा ओलसर परिस्थितीत जर फायटोप्थोरा करपा (तूर उबळणे, जळणे, मर लागणे) दिसून आला, तर

५० ते १०० मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा १० लिटर पाण्यात मिसळून

तुरीच्या मुळाजवळ ड्रेंचिंग / आळवणी करावी.

शेतात पाणी साचू देऊ नये, याची विशेष काळजी घ्यावी.

हळद आणि अद्रक (Turmeric & Ginger)

या पिकांत कंदकूज (Rhizoctonia, Pythium, Phytophthora) हा प्रमुख जमिनीतील रोग असतो.

पिकाची उगवण झाल्यानंतर साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २ ते ४ लिटर द्रवरूप ट्रायकोडर्मा प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.

संपूर्ण पिकाच्या ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीत, कंदकूजचा धोका पाहून २ ते ३ वेळा ड्रेंचिंग करता येते.

हे एकात्मिक रोग व्यवस्थापनातील पर्यावरणनिष्ठ उपाय आहे.

संत्रा (Orange)

संत्रा लागवडीच्या वेळी ५० ते १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा

५० ते १०० मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा प्रति झाड शिफारशीत शेणखताबरोबर वापरावे.

सहा वर्षांवरील झाडांसाठी दरवर्षी १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा द्यावे.

डिंक्या रोग व्यवस्थापनासाठी

ट्रायकोडर्मा हरजियानम, ट्रायकोडर्मा एसपिलियम आणि सुडोमोनास फ्लोरन्सस प्रत्येकी १०० ग्रॅम (किंवा १०० मिली द्रवरूप) शेणखतात मिसळून झाडाच्या परिघात द्यावे.

ठिबक सिंचनाद्वारे वर्षातून २–३ वेळा ट्रायकोडर्मा आळवणी केल्यास संत्रा झाडांचे आरोग्य चांगले राहते.

पेरू (Guava)

पेरू पिकात घन लागवड पद्धतीचा अवलंब करताना प्रति खड्डा २५ ग्रॅम (किंवा २५ मिली) ट्रायकोडर्मा, पीएसबी व अझोटोबॅक्टर शिफारशीत शेणखताबरोबर द्यावे.

दुसऱ्या वर्षी व नंतर दरवर्षी जून आणि जानेवारी महिन्यात प्रति झाड ५० ग्रॅम किंवा ५० मिली ट्रायकोडर्मा वापरावा.

हे जमिनीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखून पिकाच्या उत्पादनात वाढ करते.

पपई (Papaya)

पपई पिकात मूळ आणि खोड सड हा गंभीर रोग ट्रायकोडर्माच्या मदतीने टाळता येतो.

५० ते १०० मिली ट्रायकोडर्मा प्रति झाड या प्रमाणात

मुळाजवळ ड्रेंचिंग / आळवणी केल्यास रोगावर प्रभावी नियंत्रण मिळते.
यामुळे झाडांची वाढ जोमदार होते आणि उत्पादन वाढते.

ट्रायकोडर्मा वापरातील महत्वाच्या सूचना

* कोरड्या जमिनीत वापर करू नये 

* जमिनीत ओलावा असणे आवश्यक.

* सेंद्रिय खताबरोबरच वापर करावा.

* ट्रायकोडर्मा दीर्घकाळ साठवून ठेवू नये 

* शक्य तितक्या लवकर वापरावा.

* रासायनिक आणि जैविक निविष्ठा एकत्र मिसळू नयेत.

* नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने वापर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 

ट्रायकोडर्मा, पीएसबी, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, मेटारायझियम आणि इतर जैविक निविष्ठांच्या उपलब्धतेसाठी

भगवान देशमुख,
जैविक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र, करडा (वाशिम)
फोन: ९०११९७०५२२

- राजेश डवरे, तांत्रिक समन्वयक, कृषी महाविद्यालय रिसोड तथा कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशिम.

हे ही वाचा सविस्तर : Falpik Vima Yojana : आंबा, संत्रा, डाळिंब, पपई शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; मिळणार विमा कवच! वाचा सविस्तर

Web Title : ट्राइकोडर्मा का उपयोग: जैविक फफूंदनाशक के लिए किसान गाइड

Web Summary : ट्राइकोडर्मा, एक लाभकारी कवक, का उपयोग तुअर, हल्दी, अदरक, खट्टे फल, अमरूद और पपीता जैसी फसलों में कैसे करें। रोग प्रबंधन के लिए उचित अनुप्रयोग, खुराक और समय महत्वपूर्ण है। जैविक उर्वरकों के साथ और विशेषज्ञ मार्गदर्शन में उपयोग करना सबसे अच्छा है।

Web Title : Using Trichoderma: A Farmer's Guide to Bio-Fungicide Application

Web Summary : Learn how to use Trichoderma, a beneficial fungus, in crops like pigeon pea, turmeric, ginger, citrus, guava, and papaya. Proper application, dosage, and timing are crucial for disease management. It is best to use with organic fertilizers and under expert guidance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.