Lokmat Agro >स्मार्ट शेती > PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर 

PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर 

Latest News PM Kisan ekyc Do ekyc to get 19th installment of PM Kisan scheme Read in detail | PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर 

PM Kisan ekyc : पीएम किसानचा 19 वा हफ्ता मिळण्यासाठी 'ही' गोष्ट कराच.. वाचा सविस्तर 

PM Kisan ekyc : आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या (PM Kisan Scheme) 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लवकरच १९ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

PM Kisan ekyc : आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या (PM Kisan Scheme) 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लवकरच १९ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

PM Kisan ekyc : पंतप्रधान किसान (PM Kisan Scheme) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. लवकरच १९ वा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया दोन मिनिटात पूर्ण कशी करायची, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात... 

योजनेचा लाभ कसा घ्यावा?
पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन ई-केवायसी अनिवार्य आहे. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे, शेतकऱ्यांचे आधार कार्ड योजनेशी लिंक केले जाते, ज्याअंतर्गत शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, जेणेकरून हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते.

PM Kisan e-KYC प्रक्रिया

  1. पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. 
  2. यानंतर 'Farmers Corner' या पर्यायासमोरील 'E-KYC' विकल्प चुनें.हा पर्याय निवडायचा आहे. 
  3. पुढील रकान्यात शेतकऱ्यांनी नोंद असलेला आधार नंबर टाकायचा आहे. 
  4. आता आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. 
  5. मोबाईलवर मिळालेला OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा. 
  6. अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने ekyc करता येते. 

 

अँपमधून e-KYC प्रक्रिया

  1. जर तुमच्याकडे पीएम किसानचे अँप असेल तर... 
  2. सर्वप्रथम अँप ओपन करायचे आहे. 
  3. पुढील इंटरफेसवर Allow बटनावर क्लिक करायच आहे. 
  4. यानंतर आपली भाषा निवडायची आहे. 
  5. पुढील विंडोमध्ये विविध पर्याय दिसतील. यातील आधार केवायसी यावर क्लिक करा. 
  6. या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च बटनावर क्लिक करा. 
  7. आता आपल्यासमोर Ekyc  झाली असल्याचा मॅसेज येईल. 

 

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Latest News PM Kisan ekyc Do ekyc to get 19th installment of PM Kisan scheme Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.