Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

latest news LPG Gas KYC Scam: How to keep bank account safe while updating gas KYC? Cyber Police alert. | LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

LPG Gas KYC Scam: गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

LPG Gas KYC Scam: गॅस सबसिडी बंद होईल किंवा कनेक्शन रद्द होईल, अशी भीती दाखवून सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंक, APK फाइल आणि OTP च्या माध्यमातून काही सेकंदांतच बँक खाते साफ करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सतर्क राहणे अत्यावश्यक बनले आहे. (LPG Gas KYC Scam)

LPG Gas KYC Scam: गॅस सबसिडी बंद होईल किंवा कनेक्शन रद्द होईल, अशी भीती दाखवून सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढत आहेत. फेक लिंक, APK फाइल आणि OTP च्या माध्यमातून काही सेकंदांतच बँक खाते साफ करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सतर्क राहणे अत्यावश्यक बनले आहे. (LPG Gas KYC Scam)

LPG Gas KYC Scam : तुमची गॅस सबसिडी बंद झाली आहे", "आजच KYC अपडेट करा नाहीतर कनेक्शन कापले जाईल"... मोबाईलवर आलेला असा एक मेसेज किंवा फोन कॉल तुमचं आयुष्यभराची कमाई क्षणात शून्य करू शकतो.(LPG Gas KYC Scam)

सध्या सायबर लुटारूंनी गॅस सिलेंडरच्या नावाखाली फसवणुकीचा एक भयानक सापळा रचला असून, 'एपीके' (APK) फाईल्सच्या माध्यमातून लोकांची बँक खाती साफ केली जात आहेत.(LPG Gas KYC Scam)

पोलिसांनाही चक्रावून टाकणाऱ्या या नव्या गुन्ह्याची पद्धत नेमकी काय आहे आणि तुम्ही यापासून स्वतःला कसं वाचवू शकता? पहा हा विशेष रिपोर्ट (LPG KYC)

भीती दाखवून लूट: असा आहे सायबर गुन्हेगारांचा नवा 'ट्रॅप'

सध्या गॅस नियमावलीत होत असलेल्या बदलांमुळे नागरिक गोंधळलेले आहेत. केवायसीसाठी गॅस एजन्सीबाहेर लागणाऱ्या रांगा आणि तांत्रिक अडचणींचा फायदा आता सायबर चोरटे घेत आहेत.

भामटे नेमके काय करतात?

फेक कॉल: "मी गॅस एजन्सीमधून बोलतोय, तुमची सबसिडी थांबली आहे," असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो.

धमकावणे: "आजच केवायसी अपडेट केली नाही, तर तुमचे गॅस कनेक्शन कायमचे बंद होईल," अशी भीती घातली जाते.

संशयास्पद लिंक्स: व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर एक लिंक पाठवली जाते आणि त्यावर माहिती भरण्यास सांगितले जाते.

'एपीके' (APK) फाईलचा धोका: मोबाईलचा ताबा लुटारूंकडे!

केवळ गॅसचेच नव्हे, तर आरटीओ (RTO) चलन किंवा वीज बिल थकल्याचे सांगून लुटारू आता 'APK' फाईल्स पाठवत आहेत.

या फाईल्समध्ये धोकादायक 'मालवेअर' (व्हायरस) असतो. एकदा का तुम्ही ही फाईल डाऊनलोड केली की, तुमच्या मोबाईलचा आणि बँक खात्याचा पूर्ण ताबा लुटारूंकडे जातो.

नागरिकांनी कोणत्याही अमिषाला किंवा भीतीला बळी पडू नये. अधिकृत कामासाठी प्रत्यक्ष गॅस कार्यालयात जाऊनच खात्री करावी. सतर्कता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा उत्तम उपाय आहे. - नीलेश केळे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, बीड.

स्वत:चा बचाव कसा कराल? (Safety Tips)

* ओटीपी शेअर करू नका : कोणतीही गॅस एजन्सी फोनवर बँक तपशील किंवा ओटीपी (OTP) मागत नाही.

* लिंकवर क्लिक टाळा : अनोळखी नंबरवरून आलेल्या कोणत्याही लिंकवर किंवा 'Pay Now' च्या बटणवर क्लिक करू नका.

* रिमोट ॲप टाळा : 'AnyDesk' किंवा 'TeamViewer' सारखी स्क्रीन शेअरिंग अॅप्स अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून डाऊनलोड करू नका.

* प्रत्यक्ष भेट द्या : केवायसी संदर्भात काहीही शंका असल्यास आपल्या अधिकृत गॅस वितरकाकडे जाऊन खात्री करा.

फसवणूक झाल्यास काय करावे?

जर तुमची सायबर फसवणूक झाली असेल, तर वेळ न घालवता तातडीने १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. तसेच www.cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा. 

सायबर गुन्ह्यात पहिल्या काही तासांत (Golden Hours) तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.

हे ही वाचा सविस्तर : Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana : सावधान! विमा कंपनी पैसे अडवत असेल? मग ग्राहक आयोगाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठीच!

अधिक वाचा : Vay Vandana Card : वय वंदना कार्ड काढले का? सत्तरीपार ज्येष्ठांसाठी १० लाखांचे 'आरोग्यकवच'

Web Title : एलपीजी गैस केवाईसी घोटाला: बैंक खाते सुरक्षित रखें, साइबर पुलिस की चेतावनी!

Web Summary : साइबर अपराधी एलपीजी के लिए फर्जी केवाईसी अपडेट का उपयोग करके पैसे चुरा रहे हैं। वे एसएमएस या व्हाट्सएप के माध्यम से लिंक भेजते हैं जो मैलवेयर डाउनलोड करते हैं, जिससे उन्हें आपके फोन और बैंक खाते तक पहुंच मिलती है। पुलिस सावधानी बरतने और गैस एजेंसियों से सीधे संपर्क करने की सलाह देती है।

Web Title : LPG Gas KYC Scam: Protect Bank Accounts, Cyber Police Warn!

Web Summary : Cybercriminals are using fake KYC updates for LPG to steal money. They send links via SMS or WhatsApp that download malware, giving them access to your phone and bank account. Police advise caution and direct contact with gas agencies.