Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi Salla : हवामान बदलात रोगकिडींवर कोणते उपाय करावे? जाणून घ्या सविस्तर

Krushi Salla : हवामान बदलात रोगकिडींवर कोणते उपाय करावे? जाणून घ्या सविस्तर

latest news Krushi Salla : What measures should be taken against pests in the face of climate change? Find out in detail | Krushi Salla : हवामान बदलात रोगकिडींवर कोणते उपाय करावे? जाणून घ्या सविस्तर

Krushi Salla : हवामान बदलात रोगकिडींवर कोणते उपाय करावे? जाणून घ्या सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत.  (Krushi Salla)

हवामानाचा अंदाज

१४ सप्टेंबर : धाराशिव, लातूर तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी पाऊस.

१५ सप्टेंबर : धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी येथे बऱ्याच ठिकाणी पाऊस.

१६ सप्टेंबर : जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस.

कमाल व किमान तापमानात पुढील ४–५ दिवस फारसा फरक होणार नाही.

१८ सप्टेंबर दरम्यान पावसाची पातळी सरासरीपेक्षा जास्त, तापमान सरासरी एवढे राहण्याचा अंदाज.

सर्वसाधारण सल्ला

मुसळधार पावसामुळे शेतात, फळबागेत, भाजीपाला व फुलपिकांमध्ये पाणी साचू देऊ नका, निचरा व्यवस्था करा.

पिकांवरील फवारण्या पावसाची उघडीप बघूनच घ्याव्यात.

पीकनिहाय शिफारसी

सोयाबीन

पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी दिसल्यास

क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५% – ६० मि.ली. (३ मि.ली./१० लि. पाणी)

किंवा इंडाक्झाकार्ब १५.८% – १४० मि.ली. (७ मि.ली./१० लि.)

रोग (रायझोक्टोनिया, करपा, चारकोल रॉट) आढळल्यास

टेब्युकोनॅझोल + सल्फर (५०० ग्रॅ./एकर) किंवा पायरोक्लोस्ट्रोबिन गटातील बुरशीनाशकाची फवारणी.

पांढरी माशी आढळल्यास पिवळे चिकट सापळे (१०/एकर) लावा; पिवळा मोझॅक दिसल्यास ग्रस्त झाडे उपटा.

शेंगा वाढीसाठी ००:५२:३४ खताचे १०० ग्रॅ./१० लि. पाण्यात द्रावण करून फवारणी.

खरीप ज्वारी

पाणी साचू नये.

लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट ५% (४ ग्रॅ./१० लि.) किंवा स्पिनेटोरम ११.७% (४ मि.ली./१० लि.) आलटून पालटून वापरा.

ऊस

पांढरी माशी/पाकोळी दिसल्यास

लिकॅनीसिलियम लिकॅनी (४० ग्रॅ./१० लि. पाणी)

किंवा क्लोरोपायरीफॉस ३० मि.ली./१० लि. पाणी.

पोक्का बोइंग व लाल कुज रोगांवर कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा ॲझॉक्सीस्ट्रोबिन + डायफेन्कोनॅझोल फवारावे.

हळद

कंदमाशीवर क्विनालफॉस २५% (२० मि.ली./१० लि.) किंवा डायमिथोएट ३०% (१५ मि.ली./१० लि.).

पानावरील ठिपक्यांवर कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड.

फळबाग व्यवस्थापन

संत्रा/मोसंबी : फळवाढीसाठी ००:५२:३४ १.५ किलो + जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅ./१०० लि. पाणी फवारणी.

डाळींब : अतिरिक्त फुटवे काढा, ००:००:५० १.५ किलो/१०० लि. पाणी फवारणी.

चिकू : पिकलेली फळे वेळेवर काढा व सुरक्षित ठिकाणी साठवा.

भाजीपाला

मिरची, वांगे, भेंडीमध्ये रसशोषक किडींवर

पायरीप्रॉक्सीफेन + फेनप्रोपाथ्रीन (१० मि.ली./१० लि.) किंवा डायमिथोएट (१३ मि.ली./१० लि.) फवारणी.

फुलशेती

पाणी साचू देऊ नका, काढणीस तयार फुले वेळेवर काढा.

जमिनीत आर्द्रता असताना अंतरमशागती करून तण नियंत्रण.

तुती रेशीम उद्योग

तुती अवशेषांपासून गांडूळखत तयार करून रासायनिक खताचा वापर कमी करा.

पशुधन

गोठ्यातील आर्द्रता कमी करा, भेगा/फटीतील गोचिडांची अंडी व अर्भके काढून स्वच्छता ठेवा.

पावसाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण, निचरा, तसेच रोगकिडींचे वेळेवर व्यवस्थापन केल्यास उत्पन्नातील संभाव्य नुकसान टाळता येईल. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे.

(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : शेतकऱ्यांचा प्रश्न : जैविक शेतीचे मुख्यालय अकोल्यातून का हलवताय? वाचा सविस्तर

Web Title: latest news Krushi Salla : What measures should be taken against pests in the face of climate change? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.