Krushi Salla : मराठवाड्यात सध्या पावसाचा तुटवडा असून शेतकरी चिंतेत आहेत. अशा वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून हवामानाचा अंदाज व पीक संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन जारी करण्यात आले आहे.(Krushi Salla)
पुढील काही दिवसांत केवळ तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता वर्तविली गेली असून, शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(Krushi Salla)
मराठवाड्यात येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्यानुसार पिकांचे नियोजन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि हवामान सेवा प्रकल्पामार्फत देण्यात आला आहे.(Krushi Salla)
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज, जमीन स्थिती आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन शिफारशीनुसार योग्य वेळी फवारणी, खत व्यवस्थापन आणि निचऱ्याच्या उपाययोजना कराव्यात. वापसा असताना अंतरमशागत व तणनियंत्रणावर भर देणे अत्यावश्यक आहे.(Krushi Salla)
हवामानाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून मिळालेल्या अंदाजानुसार, २ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दीर्घकालीन अंदाज (१ ते ७ ऑगस्ट) दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल तर कमाल तापमान सामान्य ते कमी असेल तर किमान तापमान थोडे जास्त असेल.
बाष्पोत्सर्जन घटले
सॅक, इस्रो अहमदाबादच्या बाष्पोत्सर्जन नकाशांनुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
पीक सल्ला
कापूस
आकस्मिक मर नियंत्रणासाठी विशेष द्रावणाची आळवणी व माती दाबून घेणे.
रसशोषक किडींसाठी निंबोळी अर्क / ॲसिटामॅप्रिड / फलोनिकॅमिड यापैकी एकाची फवारणी.
कोरडवाहू व बागायती कापसाला नियमानुसार वरखत द्यावी.
साचलेलं पाणी निघून जाईल याची दक्षता घ्यावी.
तूर
सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेवर उपाय : मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट + 19:19:19 खताची फवारणी करावी.
वापसा असताना अंतरमशागत करून तण नियंत्रण.
मूग / उडीद
मावा किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी
पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची सोय करावी
मका
लष्करी अळी नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट / स्पिनेटोरमची फवारणी करावी
पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि वापसा असताना फवारणी करावी.
भुईमूग
पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
वापसा असताना अंतरमशागत करावी
ऊस
पांढरी माशी, पोक्का बोइंग रोगावर जैविक व रासायनिक उपाय करावे
पाण्याचा निचरा करावा व वेळेवर फवारणी करावी.
फळबाग
केळी
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच रोगग्रस्त पाने काढून टाकावे.
युरियाची खतमात्रा व रोगनाशक आळवणी.
आंबा
रसशोषक किडींसाठी इमिडाक्लोप्रिडची फवारणी करावी.
द्राक्ष
19:19:19 खताची फवारणी करून रोगग्रस्त पाने काढावीत.
सिताफळ
मर व बुरशीजन्य रोगासाठी कार्बेन्डाझिम + कॉपर ऑक्सीक्लोराइडची फवारणी.
भाजीपाला व फुलशेती
काकडीवर्गीय पिके
डाऊनी मिल्ड्यू रोगासाठी मेटालॅक्झील + मॅन्कोझेब फवारणी करावी.
शेंडा/फळ पोखरणाऱ्या अळ्यांना रोखण्यासाठी कामगंध सापळे / क्लोरपायरीफॉस / क्लोरँट्रानिलीप्रोल फवारणी करावी.
फुलपिके
पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी, काढणीस तयार फुले वेळीच काढा.
पशुधन व्यवस्थापन
लम्पी स्किन रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
वासरांना चिक पाजवा, जंतनाशक औषध द्या.
लसीकरण व विलगीकरण करा.
स्वच्छ पाणी, चारा आणि जखमांची निगा आवश्यक आहे.
हे ही वाचा सविस्तर : Animal Care Tips : जनावरांची प्रतिकारशक्ती कमी; लसीकरण आणि स्वच्छता हाच उपाय