Krushi Salla : मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि रोगकिडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. (Krushi Salla)
सोयाबीन, ज्वारी, ऊस, हळद आणि फळबागांसाठी तज्ज्ञांनी दिलेले हे मार्गदर्शन उत्पादन वाढविण्यासोबतच खर्चात बचत करण्यासही मदत करेल.(Krushi Salla)
पावसाचे स्वरूप कसे असेल
मराठवाड्यात सध्या हलका ते मध्यम पाऊस सुरू असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट व जोरदार सरींची शक्यता आहे. २-३ दिवसांमध्ये किमान तापमान स्थिर राहील, तर कमाल तापमान किंचित वाढेल. वादळी वाऱ्याचा वेग ३०-४० किमी/ता पर्यंत राहू शकतो. अशा स्थितीत पिकांचे रक्षण आणि रोगकिडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आवश्यक आहे.
सोयाबीन
पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या; निचरा करा.
शेंगा पोखरणारी अळी/खोडकिडीवर नियंत्रणासाठी
क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५% – ६० मिली / एकर (३ मिली/१० लिटर)
इंडाक्झाकार्ब १५.८% – १४० मिली / एकर
फवारणी पावसाची उघडीप बघून आलटून-पालटून करा.
बुरशीजन्य रोगांवर (एरियल ब्लाईट, करपा, चारकोल रॉट)
टेब्युकोनॅझोल + सल्फर ५०० ग्रॅम / एकर किंवा
पायरोक्लोस्ट्रोबीन + इपिक्साकोनाझोल ३०० मिली / एकर.
शेंगा वाढीसाठी ००:५२:३४ खत १०० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
खरीप ज्वारी
पाणी साचल्यास निचरा करा.
लष्करी अळीवर नियंत्रण
इमामेक्टीन बेन्झोएट ४ ग्रॅम /१० लिटर पाणी किंवा
स्पिनेटोरम ४ मिली /१० लिटर पाणी.
फवारणी करताना औषध कणसाच्या पोंग्यात जाईल याची काळजी घ्या.
ऊस
पाणी साचल्यास निचरा करा.
पांढरी माशी/पाकोळी : लिकॅनीसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम/ १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड ३ मिली/१० लिटर पाणी.
पोक्का बोइंग रोग : कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब ५० ग्रॅम/१० लिटर पाणी.
हळद
पाणी साचू न देणे अत्यंत आवश्यक.
कंदमाशीवर : क्विनालफॉस २० मिली किंवा डायमिथोएट १५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी.
करपा/पानावरील ठिपके : कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम/१० लिटर पाणी.
कंद वाढीसाठी : ००:५२:३४ – १५.५ किलो/एकर + ००:००:५० – ५.५ किलो/एकर सूक्ष्म सिंचनाद्वारे.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी : फळ वाढीसाठी ००:५२:३४ – १.५ किलो + जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅम /१०० लिटर पाणी फवारावे.
डाळिंब : ००:००:५०- १.५ किलो /१०० लिटर पाणी फवारून अतिरिक्त फुटवे काढून टाका.
चिकू : काढणीस तयार फळे वेळीच गोळा करा; पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
भाजीपाला
पाणी साचू देऊ नका.
काढणीस तयार भाजीपाला वेळीच तोडा.
रसशोषक किडींवर : पायरीप्रॉक्सीफेन + फेनप्रोपाथ्रीन १० मिली / १० लिटर पाणी किंवा डायमेथोएट १३ मिली /१० लिटर पाणी.
फुलशेती
काढणीस तयार फुले वेळीच तोडा.
तण नियंत्रणासाठी पावसाची उघडीप बघून आंतर मशागत करा.
तुती रेशीम उद्योग
तुतीच्या बागेत उरलेली पाने, फांद्या व रेशीम किड्याची विष्ठा खतासाठी वापरा.
16×8×4 फूट खड्ड्यात ६ महिने कुजवून उत्तम कंपोस्ट तयार करता येते.
पशुधन व्यवस्थापन
गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवा.
गोचीड व किटक नष्ट करण्यासाठी भेगा/फटी स्वच्छ करून कीटकांचे अंडे व अर्भकावस्था हटवा.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीचा बाजार तेजीत; शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा वाचा सविस्तर