Krushi Salla : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Krushi Salla)
शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे, फळबागांचे आणि भाजीपाल्याचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कृषी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या कृषी हवामान सल्ल्यानुसार जाणून घ्या, कोणते उपाय तातडीने करावेत.(Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची हजेरी राहणार आहे.१० ते १२ ऑगस्टदरम्यान मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.(Krushi Salla)
विस्तारीत हवामान अंदाज
८ ते १४ ऑगस्ट : पाऊस सरासरीएवढा ते जास्त, तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त.
१५ ते २१ ऑगस्ट : पाऊस सरासरीएवढा ते जास्त, कमाल तापमान किंचित कमी, किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त.
पीक व्यवस्थापन सल्ला
तणनियंत्रणासाठी अंतरमशागती करा.
पाने खाणाऱ्या अळीवर ५ टक्के निंबोळी अर्क किंवा शिफारस केलेले कीटकनाशक पावसाची उघडीप बघून फवारावे.
पांढरी माशी आढळल्यास पिवळे चिकट सापळे लावा आणि पिवळा मोझॅकग्रस्त झाडे काढून नष्ट करा.
खरीप ज्वारी व बाजरी
जमिनीत वापसा असताना अंतरमशागती करून तणनियंत्रण करा.
लष्करी अळीवर इमामेक्टीन बेन्झोएट किंवा स्पिनेटोरम आलटून-पालटून फवारणी करा.
ऊस
पांढरी माशी व पाकोळीवर जैविक बुरशी लिकॅनीसिलियम लिकॅनी किंवा शिफारस केलेले कीटकनाशक वापरा.
पोक्का बोइंग रोगावर कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड फवारणी करा.
हळद
२५ किलो नत्र व सूक्ष्मअन्नद्रव्य विभागून द्यावे.
पानावरील ठिपके व करपा रोगावर कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब फवारणी करा.
कंदमाशीवर क्विनालफॉस किंवा डायमिथोएट आलटून-पालटून फवारणी करा.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी : १९:१९:१९ खत फवारावे, रोगावर कॉपर ऑक्सीक्लोराइड वापरावे.
डाळींब : खत सूक्ष्मसिंचनाद्वारे द्या, अतिरिक्त फुटवे काढा.
भाजीपाला
काढणीस तयार पिके वेळेवर काढा.
डाऊनी मिल्ड्यू, शेंडा व फळ पोखरणारी अळी, पावडरी मिल्ड्यू रोगावर शिफारस केलेली फवारणी पावसाची उघाड बघून करा.
फुलशेती
काढणीस तयार फुलपिकांची वेळेवर काढणी करा.
अंतरमशागती करून तणमुक्त ठेवा.
पशुधन
पावसाळ्यात कोंबडी व शेळ्यांना वेळेवर लसीकरण करा.
निवारा स्वच्छ व जैवसुरक्षा मर्यादेत ठेवा.
मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे शेतात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या व अतिरिक्त पाण्याचा निचरा करा.