Lokmat Agro >स्मार्ट शेती > Krushi Salla : मराठवाड्यात पाऊस; शेतकऱ्यांसाठी खास कृषी मार्गदर्शन वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात पाऊस; शेतकऱ्यांसाठी खास कृषी मार्गदर्शन वाचा सविस्तर

latest news Krushi Salla: Marathwada rains; Read special agricultural guidance for farmers in detail | Krushi Salla : मराठवाड्यात पाऊस; शेतकऱ्यांसाठी खास कृषी मार्गदर्शन वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात पाऊस; शेतकऱ्यांसाठी खास कृषी मार्गदर्शन वाचा सविस्तर

Krushi Salla : मराठवाड्यात सर्वत्र वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार बरसत आहे. यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा व पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचा तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला वाचा सविस्तर(Krushi Salla)

Krushi Salla : मराठवाड्यात सर्वत्र वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार बरसत आहे. यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा व पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचा तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला वाचा सविस्तर(Krushi Salla)

शेअर :

Join us
Join usNext

Krushi Salla : मराठवाड्यात सर्वत्र वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार बरसत आहे. यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा व पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचा तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला वाचा सविस्तर  (Krushi Salla)

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिके, फळबागा व पशुधनासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.(Krushi Salla)

२१ ते २३ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच वादळी वारे ताशी ३०–४० किमी वेगाने वाहतील.(Krushi Salla)

कृषी सल्ला

पीक व्यवस्थापन

कापूस, तूर, मूग, उडीद, मका व भूईमूग पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

साचलेले पाणी तातडीने निचरा करून टाकावा.

फवारणीची कामे पावसामुळे किमान २ दिवस पुढे ढकलावीत.

कापसात आकस्मिक मर रोग दिसल्यास १०० लिटर पाण्यात कॉपर ऑक्सीक्लोराइड २५० ग्रॅम + युरिया २ किलो + पांढरा पोटॅश (००:००:५०) १ किलो मिसळून

झाडांच्या बुंध्याशी आळवणी करावी.

फळबाग व्यवस्थापन

केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगट झाडांवर योग्य औषधांची आळवणी करावी.

भाजीपाला

पिकात पाणी साचू देऊ नये.

काढणीस तयार असलेल्या भाज्या वेळेत काढून घ्याव्यात.

फुलशेती

फुलपिकात अतिरिक्त पाणी न साचता निचऱ्याची सोय करावी.

तयार फुलांची वेळेवर काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

गोठे हवेशीर व कोरडे ठेवावेत.

पावसाचे पाणी शेडजवळ साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.

कुक्कुटपालन शेडमध्ये स्वच्छ पाणी व योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी.

दर १५ दिवसांनी गोठ्याचे निर्जंतुकीकरण (पोटॅशियम परमॅंगनेट) करावे.

माशा व कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छता राखावी.

शेतकरी बांधवांनो, या काळात पिके व जनावरांमध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

फवारणी व खत व्यवस्थापन पावसाच्या उघडीपीनंतर करावे.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Management : कपाशीला पावसाचा फटका; कीड व रोगांवर तातडीचे उपाय करा

Web Title: latest news Krushi Salla: Marathwada rains; Read special agricultural guidance for farmers in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.