Krushi Salla : दमट वातावरणामुळे पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात पिकांचे आणि पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तज्ज्ञ काय सांगतात, ते वाचा सविस्तर (Krushi Salla)
हवामानाचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २८ ऑगस्टदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
२४ ऑगस्ट: छत्रपती संभाजी नगर, जालना
२५ ऑगस्ट: हिंगोली, नांदेड
२६ ऑगस्ट: नांदेड
वाऱ्याचा वेग ३०–४० कि.मी./ तास इतका राहण्याची शक्यता आहे, तसेच वादळी वारा व मेघगर्जन होऊ शकते.
या दिवसांत पिकांवर दमट वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.
तापमानाची स्थिती
२५ ऑगस्टपर्यंत कमाल व किमान तापमान सरासरीप्रमाणे राहील.
पुढील चार ते पाच दिवसात तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.
२९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान पाऊस व तापमान सरासरीप्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला
पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
दमट व ढगाळ वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त आहे.
अंतरमशागती व तण नियंत्रण करून उत्पादन वाढवता येईल.
पिक व्यवस्थापनासाठी शिफारसी
सोयाबीन
पाने खाणाऱ्या अळी, शेंगा पोखरणारी अळी व खोड किडींसाठी
क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ % – ६० मिली / १० लिटर
इंडाक्झाकार्ब १५.८ % – १४० मिली / १० लिटर
असिटामाप्रीड २५ % + बाईफेन्थ्रीन २५ % – १०० ग्रॅम / १० लिटर
बुरशीजन्य रोग (रायझोक्टोनिया, चारकोल रॉट, शेंगा करपा)
नियंत्रणासाठी
टेब्युकोनाझोल १०% + सल्फर ६५% – ५०० ग्रॅम/एकर
पायरोक्लोस्ट्रोबीन २०% – १५०–२०० ग्रॅम/एकर
खरीप ज्वारी
लष्करी अळी प्रादुर्भाव झाल्यास
इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४ ग्रॅम / १० लिटर
स्पिनेटोरम ११.७ SC – ४ मिली / १० लिटर
ऊस
पांढरी माशी व पाकोळी आढळल्यास जैविक / रासायनिक फवारणी करावी.
लिकॅनीसिलियम लिकॅनी – ४० ग्रॅम / १० लिटर
क्लोरोपायरीफॉस २०% – ३० मिली / १० लिटर
पोक्का बोइंग रोगासाठी
कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% – ५० ग्रॅम / १० लिटर
कॉपर ऑक्सीक्लोराइड ५०% – २० ग्रॅम / १० लिटर
हळद
कंदमाशी व पानावरील रोग अढळल्यास
क्विनालफॉस २५% – २० मिली / १० लिटर
डायमिथोएट ३०% – १५ मिली / १० लिटर
पानावरील रोगांसाठी: कार्बेन्डाझिम ५०% किंवा मॅन्कोझेब ७५% / कॉपर ऑक्सीक्लोराइड
फळबागा व्यवस्थापन
संत्रा / मोसंबी पिकासाठी
डायकोफॉल – २५–३० ग्रॅम / १० लिटर
फळवाढीसाठी ००:५२:३४ – १५ ग्रॅम/लिटर + जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅम / १०० लिटर
डाळिंब: १९:१९:१९ खताची मात्रा सूक्ष्म सिंचनाद्वारे देणे; अतिरिक्त फुटवे काढणे.
चिकू: अंतरमशागती करून तण नियंत्रण करणे.
भाजीपाला
काढणीस तयार पिके काढणे; ओलावा / वापसा असलेल्या पिकांना खत देणे.
शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळींसाठी
क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५% – ४ मिली / १० लिटर
क्लोरपायरीफॉस २०% – २० मिली / १० लिटर
सायपरमेथ्रीन १०% EC – ११ मिली / १० लिटर
फुलशेती
काढणीस तयार फुलपिकांची वेळेत काढणी.
अंतरमशागती करून तण नियंत्रण करणे.
तुती रेशीम उद्योग
१ एकर तुतीसाठी ५ पिल्ले / वर्ष प्रमाणे संगोपन गृह, रॅक व हौदाचे शिफारस केलेले माप.
कोष उत्पादन: १० क्विंटल/एकर, अंदाजे ५ लाख / एकर उत्पन्न.
पशुधन व्यवस्थापन
लम्पी स्कीन रोग नियंत्रणासाठी
वासरांना चिक पाजणे
सातव्या दिवशी जंतनाशक औषध
लसीकरण
आजारी व निरोगी वासरे विलगीकरण
सुश्रुषा २०% + ८०% काळजी
माझे पशुधन, माझी जबाबदारी या सूत्रानुसार काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
(सौजन्य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)