Post Office Scheme : आपण सर्वांनी पोस्ट ऑफिसच्या योजनांविषयी ऐकले आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बचतीसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी राबवत असलेली किसान विकास पत्र योजना होय.
सद्यस्थितीत अनेकजण आपल्या पगारातून काही पैसे बचत करत असतो. शेतकरी देखील आपल्या उत्पन्नातून आगामी हंगामासाठी बचत करत असतो. किसान विकास पत्र ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही केवळ १ हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. शिवाय गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तितके गुंतवणूक करू शकता.
तुमची गुंतवणूक दुप्पट कशी होते?
केव्हीपी योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चक्रवाढ व्याजदर. समजा तुम्ही १ लाख रुपये गुंतवले. पहिल्या वर्षाच्या शेवटी, तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज म्हणून ७ हजार ५०० मिळतील, जे पुढील वर्षी मूळ रकमेत जोडले जाईल. ज्यामुळे एकूण रक्कम १ लाख ७ हजार ५०० होईल. त्याचप्रमाणे, दुसऱ्या वर्षी व्याज आणखी वाढेल, ज्यामुळे तिसऱ्या वर्षासाठी आधार तयार होईल. ही प्रक्रिया तुमच्या निधीत वाढ करत राहील. उदाहरणार्थ, जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवले तर तुमचा निधी ९.५ वर्षांनी १० लाखांपर्यंत पोहोचेल.
कोणीही KVP खाते उघडू शकतो.
या सरकारी योजनेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या व्यक्तीने किती खाती उघडता येतील, यावर मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक KVP खाती उघडू शकता. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने खाती उघडणे देखील शक्य आहे. यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला गुंतवणूक करणे सोपे होते.
किसान विकास पत्र योजना
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP) योजना ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय आहे जी किमान १,००० पासून सुरू होते आणि गुंतवणूकदारांना ७.५ टक्के चा आकर्षक व्याजदर देते. ही योजना जोखीम न घेता त्यांचे भांडवल वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे. जर तुम्ही देखील सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक शोधत असाल, तर किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते.
Read More : Tractor Scheme : महिलांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करता येणार, काय आहे ही योजना जाणून घ्या