Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Karela Farming : पारंपरिक पिकांना रामराम; कारल्याची गोडी का वाढतेय? वाचा सविस्तर

Karela Farming : पारंपरिक पिकांना रामराम; कारल्याची गोडी का वाढतेय? वाचा सविस्तर

latest news Karela Farming: Goodbye to traditional crops; Why is the sweetness of karela increasing? Read in detail | Karela Farming : पारंपरिक पिकांना रामराम; कारल्याची गोडी का वाढतेय? वाचा सविस्तर

Karela Farming : पारंपरिक पिकांना रामराम; कारल्याची गोडी का वाढतेय? वाचा सविस्तर

Karela Farming : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता कारल्याकडे वळताना दिसत आहेत. प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांचा दर, कमी पाण्याची गरज आणि अवघ्या ५५ ते ६० दिवसांत पहिला तोडा या सर्व कारणांमुळे कारले हे उन्हाळ्यातील 'कॅश क्रॉप' म्हणून पुढे येत आहे. (Karela Farming)

Karela Farming : पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता कारल्याकडे वळताना दिसत आहेत. प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांचा दर, कमी पाण्याची गरज आणि अवघ्या ५५ ते ६० दिवसांत पहिला तोडा या सर्व कारणांमुळे कारले हे उन्हाळ्यातील 'कॅश क्रॉप' म्हणून पुढे येत आहे. (Karela Farming)

Karela Farming : पारंपरिक पिकांच्या अनिश्चित उत्पन्नाला कंटाळून शेतकरी आता नगदी व भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. (Karela Farming)

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असतानाही योग्य नियोजन, ठिबक सिंचन आणि सुधारित वाणांचा वापर केल्यास कारले हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.(Karela Farming)

सध्या बाजारात कारल्याला प्रतिकिलो ६० ते ८० रुपये दर मिळत असल्याने या पिकाकडे आकर्षण वाढले आहे.(Karela Farming)

कमी पाणी, जास्त नफा

उन्हाळ्यात पाण्याची मोठी अडचण भासते. मात्र, कारल्याला इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते.

ठिबक सिंचनाद्वारे दररोज झाडाला १ ते २ लिटर पाणी दिल्यास पाण्याची बचत होते. मल्चिंग पेपरचा वापर केल्यास तणांचे प्रमाण कमी राहते आणि मातीतील ओलावा टिकून राहतो.यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफा वाढतो.

वर्षभर मागणी; मर्यादित खर्च

कारले हे वेलवर्गीय पीक असून वर्षभर बाजारात याला मागणी असते. मधुमेहासह विविध आजारांवर गुणकारी असल्याने ग्राहकांमध्ये याची मागणी स्थिर असते.

बियाणे व खतांचा खर्च तुलनेने कमी

पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन योग्य

उन्हाळी हंगामासाठी सुधारित वाणांची निवड फायदेशीर

योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ

६० दिवसांत पहिला तोडा

लागवडीनंतर अवघ्या ५५ ते ६० दिवसांत पहिली काढणी सुरू होते. कारले हे झटपट उत्पन्न देणारे पीक असल्याने रोख प्रवाह लवकर सुरू होतो.

हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे बांबू, तार किंवा नायलॉन जाळीचा मंडप (ताटी पद्धत) करणे आवश्यक आहे.

आधारावर वाढलेल्या वेलींना रोग कमी लागतात आणि फळांचा आकार व रंग अधिक आकर्षक राहतो.

काढणीनंतर प्रक्रिया नाही

हळद, सोयाबीनसारख्या पिकांवर काढणीनंतर प्रक्रिया किंवा साठवणूक करावी लागते. मात्र कारल्याच्या बाबतीत तसे नाही.

वेलीवरून फळ तोडले की ते थेट बाजारात विक्रीसाठी पाठवता येते. त्यामुळे वेळ, मजुरी आणि साठवणुकीचा खर्च वाचतो. पैसा थेट हातात येतो.

कीड नियंत्रण कसे कराल?

उन्हाळी कारल्यावर फळमाशी, मावा, पांढरी माशी, भुरी किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसू शकतो.

उपाययोजना

* एकरी पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत

* फळमाशीसाठी कामगंध सापळ्यांचा वापर

* रोग दिसताच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशक/कीटकनाशक फवारणी

बाजारभावाचा फायदा कसा घ्याल?

सध्या कारल्याला ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने नियोजनबद्ध लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

स्थानिक बाजारपेठेसोबतच शेजारच्या जिल्ह्यांतील घाऊक बाजारांशी संपर्क ठेवल्यास अधिक दर मिळण्याची शक्यता असते.

पाण्याची मर्यादित उपलब्धता, कमी खर्च, ६० दिवसांत काढणी आणि बाजारातील स्थिर मागणी या सर्व घटकांमुळे कारल्याची गोडी वाढताना दिसत आहे.

योग्य तांत्रिक मार्गदर्शन, ठिबक सिंचन आणि कीडनियंत्रणाची काळजी घेतल्यास कारले हे पीक शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यातील हुकमी एक्का ठरू शकते.

हे ही वाचा सविस्तर : Rala Crop Farming : खडकाळ जमिनीत लाखोंचा नफा; राळा ठरतोय शेतकऱ्यांचा ‘स्मार्ट’ पर्याय

अधिक वाचा : Chia Seeds Farming : चार महिन्यांत उत्पन्न हाती; चिया सीड्स बनतंय शाश्वत शेतीचा गेमचेंजर वाचा सविस्तर

Web Title : करेला की खेती: कड़वे करेले की मीठी सफलता किसानों को आकर्षित करती है; विवरण अंदर

Web Summary : पारंपरिक फसलों से तंग आकर किसान मुनाफे के लिए करेला की खेती की ओर रुख कर रहे हैं। कम पानी की आवश्यकता, लगातार मांग और त्वरित रिटर्न इसे एक आकर्षक विकल्प बनाते हैं। उचित तकनीक और कीट नियंत्रण सफलता की कुंजी हैं।

Web Title : Karela Farming: Bitter Gourd's Sweet Success Attracts Farmers; Details Inside

Web Summary : Tired of traditional crops, farmers are turning to bitter gourd farming for profit. Lower water needs, consistent demand, and quick returns make it a compelling option. Proper techniques and pest control are key to success.