Agriculture News : नागली, भात आणि खुरासणी ही खरीप हंगामातील पिके आहेत, जी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषतः इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबक सारख्या डोंगराळ प्रदेशात घेतली जातात.
भात खाचराच्या सपाट भागात आणि डोंगर उतार असलेल्या भागांवर ही पिके घेतली जातात आणि पावसाच्या हवामानानुसार या पिकांची निवड केली जाते. सद्यस्थितीत ही पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असून या कालावधीत नेमकी कशी काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात....
भात पीक हे दाणे भरण्याची ते परिपक्वता अवस्थेत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच उष्ण व दमट वातावरणामुळे भात पिकावर पिवळा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. म्हणून भात पिकावरील पिवळ्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील २ ग्रॅम प्रति लिटर 1 पाण्यात मिसळून फवारणी करावी. खाचरात रोपांच्या दाणे भरणेच्या अवस्थतेत पाण्याची पातळी १० सेमी असावी.
तर नागली पीक दाणे भरण्याची ते परिपक्वता अवस्थेत आहे. नाचणी पीक पावसाच्या पाण्यावर घेतले जाते. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्ष्यात घेता पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता पाहता उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. नाचणी पिकातील भेसळ फुलोऱ्यावर येताच लगेच काढावी.
तसेच खुरासणी पीक हे फुलोऱ्याची अवस्थेत आहे. खुरासणी पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी, खुरासणी पिकात कीटक परागीभवन घडवण्याकरिता एक मधमाश्यांचे कृत्रिम पोळे प्रति एकरसाठी वापरण्याचे शिफारस करण्यात आली आहे. म्हणून खुरासणी पिक फुलोरा अवस्थेत असेल तर कीटकनाशकाची फवारणी करू नये.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगगतपुरी