Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : भात, नागलीसाठी पूर्व मशागतीची तयारी कशी कराल? वाचा सविस्तर 

Agriculture News : भात, नागलीसाठी पूर्व मशागतीची तयारी कशी कराल? वाचा सविस्तर 

Latest News How to prepare for pre-cultivation for rice and nagli Read in detail | Agriculture News : भात, नागलीसाठी पूर्व मशागतीची तयारी कशी कराल? वाचा सविस्तर 

Agriculture News : भात, नागलीसाठी पूर्व मशागतीची तयारी कशी कराल? वाचा सविस्तर 

Agriculture News : सद्यस्थितीत पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) काय तयारी करावी, हे या लेखातून समजून घेऊयात..... 

Agriculture News : सद्यस्थितीत पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) काय तयारी करावी, हे या लेखातून समजून घेऊयात..... 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : खरीप हंगामात भात आणि नागली (Paddy Or ragi Crops) ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदाच्या खरिपातील लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रोपांच्या लागवडीसाठी जमीन भाजणी करण्यात आली आहे. 

तर दुसरीकडे पावसाने थैमान (Unseasonal Rain) घातले असून पेरणी करण्याची घाई करू नये, असंही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भात रोपांची लागवड करावी की नाही, सद्यस्थितीत पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) काय तयारी करावी, हे या लेखातून समजून घेऊयात..... 

खरीप भात (पूर्व मशागत)

  • भात पिकाचे चांगल्या प्रतीचे सुधारित वाण जसे इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती व फुले राधा विकत घेण्याचे नियोजन करावे. 
  • वाफसा स्थिती असलेल्या भागात पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून घ्यावीत. 
  • कारण भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. 
  • पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.
  • सेंद्रिय खतांचा वापर : नांगरणीच्या वेळी हेक्टरी १० मे. टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून
  • द्यावे.

खरीप नाचणी (पूर्व मशागत)

  • सुधारित वाणः फुले नाचणी, दापोली-१, दापोली सफेद, दापोली-२, फुले कासारी. 
  • वाफसा स्थिती असलेल्या भागात पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून घ्यावीत. 
  • २५ ते ३० सें.मी. खोली असलेल्या उथळ जमिनीची एक नांगरणी उतारास आडवी आणि दोन कुळवाच्या पाळ्या देणे. 
  • पेरणीपूर्वी मशागत करताना सेंद्रिय खताची मात्रा ५ टन / हेक्टरी मिसळावे.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News How to prepare for pre-cultivation for rice and nagli Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.