Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > रांगडा कांदा काढणी : कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं? 

रांगडा कांदा काढणी : कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं? 

Latest news Harvesting onions How many days should onions be kept in the shade after harvesting | रांगडा कांदा काढणी : कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं? 

रांगडा कांदा काढणी : कांदे गोळा केल्यानंतर किती दिवस सावलीत ठेवावे, त्याने काय होतं? 

Kanda Kadhani : शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात... 

Kanda Kadhani : शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात... 

Kanda Kadhani : रांगडा कांदा लागवडीपासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) सुमारे ११० ते १२० दिवसांत (जानेवारी-मार्च) काढणीस तयार होतो. कांदाकाढणीला आल्यांनतर काही लक्षणे दिसून येतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात... 

रांगडा कांदा काढणी

  • पिकाची वाढ पूर्ण होऊन, पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. 
  • त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत मिळते. 
  • कांदे घट्ट होतात, वरचा पापुद्रा सुकू कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही. 
  • कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. 
  • अन्यथा मान जास्त वाळली, तर ती कांदा उपटताना तुटतेय परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह दोन ते तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. 
  • प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील. 
  • तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सेंमी लांब नाळ (मान) ठेवून कापावी. 
  • नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत. 
  • उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत दहा ते बारा दिवस राहू द्यावेत. 
  • या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. 
  • वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. 
  • त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी 
 

Web Title : प्याज की कटाई: प्याज के संरक्षण और गुणवत्ता के लिए सुखाने की अवधि महत्वपूर्ण है।

Web Summary : जब 50-70% पत्ते गिर जाएं तो प्याज की कटाई करें। 2-3 दिनों के लिए खेत में सुखाएं, फिर पत्तों को काट लें। सड़न को रोकने और लंबे समय तक भंडारण सुनिश्चित करने के लिए 10-12 दिनों के लिए छाया में सुखाएं।

Web Title : Harvesting Onions: Drying period crucial for onion preservation and quality.

Web Summary : Harvest onions when 50-70% of tops fall. Cure in the field for 2-3 days, then cut tops. Cure in shade for 10-12 days to prevent rot and ensure longer storage.