Lokmat Agro >स्मार्ट शेती > Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Latest News Falbag lagvad Online application for orchard cultivation scheme has started, apply like this | Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Falbag Lagvad Yojana : महा-डीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग लागवड योजना करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.

Falbag Lagvad Yojana : महा-डीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग लागवड योजना करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Falbag Lagvad Yojana : सन 2025-26 करिता महा-डीबीटी शेतकरी योजना (Maha DBT Portal) पोर्टल वर फळबाग लागवड योजना करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Falbag Lagvad Yojana) ही महाराष्ट्रातील एक प्रमुख कृषी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेत, शेतकऱ्यांना विविध फळझाडांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते, जसे की आंबा, डाळिंब, पेरू, लिंबू, सीताफळ, इत्यादी. 

महाडीबीटी पोर्टलवर हे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यामध्ये "प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत असल्यामुळे एखाद्या घटका साठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ मिळणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin यावर भेट द्या. 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • फार्मर आयडी, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते तपशील, संमती पत्र (संयुक्त खाते असल्यास).
  • इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी करावी.
  • आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरताना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडावी लागतील. 

Web Title: Latest News Falbag lagvad Online application for orchard cultivation scheme has started, apply like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.