Lokmat Agro >स्मार्ट शेती > Bhat Karpa : उन्हाळी भात पिकावर खोडकिडा, करप्याचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण 

Bhat Karpa : उन्हाळी भात पिकावर खोडकिडा, करप्याचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण 

Latest News Control the infestation of stem borer and scab on summer rice crop see details | Bhat Karpa : उन्हाळी भात पिकावर खोडकिडा, करप्याचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण 

Bhat Karpa : उन्हाळी भात पिकावर खोडकिडा, करप्याचा प्रादुर्भाव, असे करा नियंत्रण 

Bhat Karpa : सद्यस्थितीत उन्हाळी धान पिकावर खोडकीड आणि करपा रोगाचा (Paddy Crop Management) प्रादुर्भाव झाला आहे. 

Bhat Karpa : सद्यस्थितीत उन्हाळी धान पिकावर खोडकीड आणि करपा रोगाचा (Paddy Crop Management) प्रादुर्भाव झाला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : खरीप हंगामातील धान पीक निघाल्यानंतर उन्हाळी थान पिकाचे (Paddy farming) पन्हे टाकून रोवणी केली जाते. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये निवडक शेतकरी उन्हाळी धान पिकाची (Unhali Paddy farming) लागवड करतात. पंधरवडा, महिनाभरापूर्वी रोवणीची कामे पूर्ण झालेली आहे. सद्यस्थितीत या पिकावर खोडकीड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 

जिल्ह्यात बाराही तालुक्यांत उन्हाळी धान पिकाची Unhali Bhat Sheti) लागवड शेतकरी करतात. यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. उन्हाळी धान पिकाची रोवणी झाल्यापासून वातावरणातील सततच्या बदलाने रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मात्र आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हिरवेकंच पीक दिसत असताना पुन्हा करपा रोगाचा (Paddy Crop Management) प्रादुर्भाव धान पिकावर वाढला आहे.

खोडकिड्यावर मिळवा नियंत्रण
खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर क्लोरपायरिफॉस २ मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच हंगामापूर्वी खोल नांगरणी करावी.

करपा रोग नियंत्रण
थान पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल ७ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम किंवा स्ट्रेप्टोमायसीन ०.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. शेतकऱ्यांनी वेळोवेळी पिकाचे निरीक्षण करावे.

सध्या धान पिकावर खोडकिडा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.
- पी. जे. मेश्राम, कृषी सहायक, वैरागड

Web Title: Latest News Control the infestation of stem borer and scab on summer rice crop see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.