Lokmat Agro >स्मार्ट शेती > Citrus Pest Management: मोसंबी व संत्र्याचे गुप्त शत्रू; सायला, काळी व पांढरी माशी नियंत्रणाचे उपाय वाचा सविस्तर

Citrus Pest Management: मोसंबी व संत्र्याचे गुप्त शत्रू; सायला, काळी व पांढरी माशी नियंत्रणाचे उपाय वाचा सविस्तर

latest news Citrus Pest Management : Secret enemies of Citrus and Oranges; Read detailed measures to control scale, black and white flies | Citrus Pest Management: मोसंबी व संत्र्याचे गुप्त शत्रू; सायला, काळी व पांढरी माशी नियंत्रणाचे उपाय वाचा सविस्तर

Citrus Pest Management: मोसंबी व संत्र्याचे गुप्त शत्रू; सायला, काळी व पांढरी माशी नियंत्रणाचे उपाय वाचा सविस्तर

Citrus Pest Management : सध्या मोसंबी आणि संत्र्या बागांवर सध्या अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने काही उपायायोजना सुचवल्या आहेत ते जाणून घ्या सविस्तर (Citrus Pest Management)

Citrus Pest Management : सध्या मोसंबी आणि संत्र्या बागांवर सध्या अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने काही उपायायोजना सुचवल्या आहेत ते जाणून घ्या सविस्तर (Citrus Pest Management)

शेअर :

Join us
Join usNext

Citrus pest management : सध्या मोसंबी आणि संत्र्या बागांवर सध्या अनेक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने काही उपायायोजना सुचवल्या आहेत ते जाणून घ्या सविस्तर (Citrus Pest Management)

मोसंबी आणि संत्र्याच्या बागेत अचानक पाने वाकडी होणे, चिकट थर दिसणे आणि काळसर बुरशी वाढणे ही कीटक हल्ल्याची लक्षणे असू शकतात. सायला, काळी व पांढरी माशी या कीटकांचा प्रादुर्भाव वेळेवर ओळखून उपाययोजना केल्यास उत्पादन व गुणवत्ता दोन्हीचे संरक्षण करता येते.(Citrus Pest Management)

मोसंबी व संत्र्याच्या उत्पादनावर विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यापैकी सायला, काळी माशी आणि पांढरी माशी या तीन किडी अत्यंत हानीकारक आहेत. योग्य वेळी लक्ष न दिल्यास पिकांचे उत्पादन आणि गुणवत्तेत लक्षणीय घट होते.(Citrus Pest Management)

सायला : ओळख आणि लक्षणे

राहण्याचे ठिकाण : पानांच्या खालच्या बाजूस.

प्रादुर्भावाचे स्वरूप : सायला रस शोषून घेतल्यामुळे पाने वाकडी होतात, कोवळ्या कोंबांवर चिकट पदार्थ तयार होतो. या पदार्थावर काळसर बुरशी वाढते आणि पाने काळी पडतात.

काळी व पांढरी माशी : ओळख आणि लक्षणे

राहण्याचे ठिकाण: पानांच्या खालच्या बाजूस.

प्रादुर्भावाचे स्वरूप: माश्या रस शोषून घेतात आणि पानांवर व फळांवर चिकट पदार्थ निर्माण करतात. त्यावरही काळी बुरशी वाढून पाने व फळे काळसर पडतात, झाडाची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया कमी होते.

नियंत्रण उपायायोजना

सायला नियंत्रणासाठी हे करा उपाय 

* शेतात तण नियंत्रण आणि झाडांची नियमित छाटणी.

* संतुलित खत व्यवस्थापन, विशेषतः नायट्रोजनचे संतुलित प्रमाण.

* प्रादुर्भाव दिसताच प्रतिबंधात्मक फवारणी.

शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर

कार्बोसल्फान

थायोमिथॉक्साम

डिनोटेफ्युरान

काळी व पांढरी माशी नियंत्रण

प्रभावित पाने छाटून नष्ट करणे.

फेरोमोन सापळे लावून प्रादुर्भाव कमी करणे.

शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी 

इमिडाक्लोप्रिड

थायोमिथॉक्साम

शेतकऱ्यांसाठी टिप्स

* सतत झाडांची पाहणी करा.

* पिकामध्ये हवेशीर वातावरण राहील यासाठी झाडांची योग्य छाटणी करा.

* पाणी व खतांचे योग्य व्यवस्थापन ठेवा.

* कीटकनाशके नेहमी शिफारस केलेल्या प्रमाणात आणि योग्य वेळेतच वापरा.

या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास त्यांच्या उपस्थितेमुळे विविध स्वरूपाचे त्या पिकास होणारे नुकसान स्पष्ट दिसते. सायला पानांच्या खालच्या भागात राहून रस शोषण करतात. यामुळे पाने वाकडी होतात, कोवळ्या कोंबावर चिकट पदार्थ तयार होतो, यावर बुरशी वाढून पाने काळी पडतात.

(स्रोत: कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Organic Weed Control : गाजर गवतावर नियंत्रणासाठी 'झायगोग्रामा' भुंगे विक्रीसाठी येथे आहेत उपलब्ध वाचा सविस्तर

Web Title: latest news Citrus Pest Management : Secret enemies of Citrus and Oranges; Read detailed measures to control scale, black and white flies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.