Vegetable Farming : वेलवर्गीय भाजीपाला (Vegetable Farming) पिकांमध्ये काकडी, कारली, दुधी भोपळा, घोसाळी, दोडका, पडवळ यांचा समावेश होतो. एप्रिल महिन्याचा उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेकदा रोगांचा प्रादुर्भाव (crop disease) दिसून येतो. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळी नेमकी कशी काळजी घ्य्यायची हे जाणून घेऊयात....
रोग व्यवस्थापन
- काळा करपा, केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मिली किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने करावी.
- जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारावे.
पाणी व्यवस्थापन
- उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते.
- सिंचन व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर, पिकाची वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात.
- उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते.
- तसेच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पाण्याची बचत करणे शक्य होते.
- विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
- शक्यतो सकाळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी सिंचन करावे. भर उन्हात दुपारी सिंचन करणे टाळावे.
-ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी