Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, बोअर खोदणे, शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, बोअर खोदणे, शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

Latest News Agriculture scheme subsidy for new well, well repair, borehole digging, farm pond see application process | नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, बोअर खोदणे, शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

नवीन विहीर, विहीर दुरुस्ती, बोअर खोदणे, शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

Agriculture Scheme : या माध्यमातून तुम्हाला नवीन विहिरीसाठी, विहीरीच्या दुरुस्तीसाठी तसेच बोअर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. 

Agriculture Scheme : या माध्यमातून तुम्हाला नवीन विहिरीसाठी, विहीरीच्या दुरुस्तीसाठी तसेच बोअर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. 

Agriculture Scheme  : राज्य शासनाच्या 'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना' तसेच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' या दोन महत्त्वाच्या कृषी योजना आहेत. या माध्यमातून तुम्हाला नवीन विहिरीसाठी, विहीरीच्या दुरुस्तीसाठी तसेच बोअर खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. 

राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबविली जाते. या योजनांचा उद्देश आदिवासी, अनुसूचित जाती प्रवर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेचा लाभघेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. संबंधित लाभार्थ्याला १०० टक्के अनुदान दिले जाते.

या घटकांसाठी मिळणार अनुदान
दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांना शेतीतील मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, शेतातील पाण्याचे प्लास्टिक आंतरसाठवण, सूक्ष्म सिंचन संच, सौर पंप, परसबाग, पाइपलाइन बसविणे, तराफा बांधकाम आणि शेती पंप (डिझेल/इलेक्ट्रिक) यांचा समावेश आहे. घटकानुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

घटकनिहाय असे मिळणार शेतकऱ्यांना अनुदान
योजनेंतर्गत घटक अनुदान

  • नवीन विहीर - ४ लाख रुपये 
  • जुनी विहीर दुरुस्ती - १ लाख रुपये 
  • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण - २ लाख रुपये 
  • सूक्ष्म सिंचन संच - ९० हजार रुपये 
  • सोलर पंप - ५० हजार रुपये 
  • परसबाग/इनवेल बोअरिंग/पंप संच - ८० हजार रुपये 

बोअर खोदण्यासाठी ५० हजारांचे अनुदान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत बोअरसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हा घटक यावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन शासनाकडून बोअरसाठी अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया व संपर्क माहिती
इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी गटविकास 3 अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती किंवा कृषी विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा.

पात्रता व आवश्यक अटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा अर्जदार अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा. दोन्ही योजनांसाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर शेती असावी. अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र, ७/१२ उतारा, आधार क्रमांक आणि बैंक खात्याची माहिती आवश्यक आहे.

 

 तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचाय, फक्त एक अर्ज करा, 'ही' योजना देतेय थेट 50 टक्के अनुदान!  

 

Web Title : कुएं, बोरवेल और फार्म तालाबों के लिए सब्सिडी: आवेदन प्रक्रिया।

Web Summary : महाराष्ट्र 'बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना' जैसी योजनाओं के तहत कुओं, बोरवेल और फार्म तालाबों के लिए सब्सिडी प्रदान करता है। पात्र किसानों को नए कुओं के लिए ₹4 लाख तक मिलते हैं। कृषि विभाग के माध्यम से आवश्यक दस्तावेजों के साथ ऑनलाइन आवेदन करें।

Web Title : Subsidy for wells, borewells, and farm ponds: Application process.

Web Summary : Maharashtra offers subsidies for wells, borewells, and farm ponds under schemes like 'Birsa Munda Krishi Kranti Yojana'. Eligible farmers receive up to ₹4 lakh for new wells. Apply online with required documents through the agriculture department.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.