Lokmat Agro >स्मार्ट शेती > तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

Is your land soil is saline? Should you plant these crops to reduce salinity? | तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?

Salt Tolerance Crop नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सतत बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य द्यावे.

Salt Tolerance Crop नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सतत बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य द्यावे.

शेअर :

Join us
Join usNext

नदी आणि कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील क्षारयुक्त आणि गाळयुक्त जमिनींचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सतत बदलत असतात. या जमिनीचे गुणधर्म वाढवण्यासाठी, एकात्मिक उपचारात्मक व्यवस्थापन पद्धतींना प्राधान्य द्यावे.

यासाठी जमिनीत विरघळणारे क्षार आणि अतिरिक्त पाणी भूमिगत किंवा खुल्या चराद्वारे काढून टाकणे गरजेचे असते. कोरडवाहू प्रदेशात पावसाळ्यात उंच भागातून पावसाच्या पाण्याद्वारे वाहून जाणारे क्षार हळूहळू पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात जमा होत असतात. 

याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांनी सिंचन क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिकांच्यामध्ये परिणाम करणाऱ्या क्षारीकरणाच्या समस्या सोडविण्याकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे.

क्षारयुक्त प्रमाण कमी करण्यासाठी माती परीक्षणाद्वारे योग्य वर्गीकरण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे सुधारणेसाठी योग्य उपाय करणे शक्य होईल. यासाठी प्रभावीपणे एकात्मिक उपाय व्यवस्थापन धोरणांना प्राधान्य द्यावे.

क्षारयुक्त जमिनींची सुधारणा
१) पाण्याचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली खोल चर काढावेत.
२) जमिनीतील क्षारांचा पृष्ठभागावरील थर काढून टाकावा.
३) शेतात विरघळणारे क्षार काढून टाकण्यासाठी शेतात २० गुंठ्यांचे लहान लहान वाफे तयार करून आणि चांगल्या ओलिताच्या पाण्याचा वापर करून विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.
४) जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी २० ते २५ टन प्रति हेक्टर सेंद्रिय खते मिसळावीत.
५) दर तीन वर्षांनी किमान एकदा हिरवळीची पिके (उदा. धैंचा, ताग इत्यादी) जमिनीत मिसळावीत.

पिकाची क्षार सहनशीलता
सर्वसाधारणपणे पिकाची उगवण व रोपावस्था क्षारास जास्त संवेदनशील असते. पीक पक्वतेच्या अवस्थेपर्यंत क्षारसहनशीलता वाढत जाते, म्हणून पेरणीसाठी नेहमीपेक्षा जास्त बियाण्याचा वापर करावा. बीजप्रक्रिया करावी. तसेच पिकांच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये जमिनीच्या वरच्या थरातील क्षारांचे प्रमाण वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.

क्षार सहनशील पिके
१) अन्नधान्ये पिके

क्षार संवेदनशील : उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटणा, तीळ इ.
मध्यम सहनशील : गहू, बाजरी, मका, मोहरी, करडई, सोयाबीन, सूर्यफूल, जवस इ.
जास्त सहनशील : ऊस, कापूस, भात, ज्वारी इ.
२) भाजीपाला पिके
क्षार संवेदनशील : चवळी, मुळा, श्रावणघेवडा इ.
मध्यम सहनशील : कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर इ.
जास्त सहनशील : पालक, शुगरबीट इ.
३) फळपिके
क्षार संवेदनशील : लिंबूवर्गीय फळझाडे.
मध्यम सहनशील : आंबा, चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्ष इ.
जास्त सहनशील : नारळ, बोर, खजूर, आवळा इ.

अधिक वाचा: Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Web Title: Is your land soil is saline? Should you plant these crops to reduce salinity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.