Lokmat Agro >स्मार्ट शेती > दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

Is it necessary to rotate crops every year? How does it benefit agriculture? Read in detail | दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

दरवर्षी पिक फेरपालट करणे गरजेचे आहे का? याचे शेतीला कसे होतात फायदे? वाचा सविस्तर

crop rotation पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते.

crop rotation पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

पिक फेरपालट म्हणजे एकाच जमिनीत विविध हंगामांमध्ये विविध पिके पेरण्याची किंवा लागवडीची प्रक्रिया. यामध्ये विशिष्ट कालावधीत एकच पिक पुन्हा पुन्हा न घेता विविध पिकांची फेरपालट केली जाते.

या पिक फेरपालट पद्धतीचा उद्देश जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, तण आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि शेतीचे एकूण आरोग्य सुधारणे हा आहे.

दरवर्षी एकच पीक घेत राहिलात तर काय होईल?
-
मातीतील एकाच प्रकारची अन्नद्रव्ये कमी होतात.
- जमिनीचा पोत बिघडतो.
- किडी-रोगांचे प्रमाण वाढते.
- उत्पादनात घट होते.

कशी कराल पिक फेरपालट?
-
मुख्य पीक बदलताना त्याच्या मागील पिकाशी असलेले साम्य टाळा म्हणजेच पुन्हा पुन्हा तेच पिक घेऊ नका.
- मुळांची खोली, पिकाची अन्नद्रव्यांची गरज, कीड-रोग प्रकार, आणि कालावधी यावर आधारित पिक फेरपालट केली तर त्याचा जमिनीला चांगला फायदा होऊन उतप्दन ही चांगले येते.
- एखाद्या हंगामात खादाड पिक घेतलं तर दुसऱ्या हंगामात चांगला बेवड असणारे पिक घ्यावे.
- विशेषतः कडधान्यांची पिके यात जास्त फायद्याची ठरतात.

पिक फेरपालटीचे फायदे
१) मातीचे आरोग्य सुधारते

वेगवेगळ्या पिकांची अन्नद्रव्य गरज वेगळी असते, त्यामुळे मातीतील संतुलन राखले जाते.
२) उत्पादनात वाढ व खर्चात बचत
मातीचा पोत सुधारल्याने उत्पादन वाढते आणि खतांचा खर्च कमी होतो.
३) किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो
एकाच प्रकारचे पीक घेतल्याने किडी/रोग स्थायिक होतात. पिक फेरपालट हे तोडते.
४) आच्छादन आणि मुळांचा उपयोग
काही पिके (उदा. डाळवर्गीय) नत्र स्थिरीकरण करून पुढच्या पिकासाठी पोषक ठरतात.

अधिक वाचा: हळद पिक घेण्याचा विचार करताय? कधी व कशी कराल लागवड? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Is it necessary to rotate crops every year? How does it benefit agriculture? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.