Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

If you want a higher return on your investment in land, then you must consider these four things while buying it | जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

जमीन गुंतवणूकीत अधिक परतावा हवा असेल तर खरेदी करताना 'ह्या' चार बाबी अवश्य पहा

jamin kharedi भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते.

jamin kharedi भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते.

भारतीयांसाठी जमीन खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक नसून एक भावनिक सुरक्षादेखील असते. फ्लॅटप्रमाणे जमिनीचे मूल्य कमी होत नाही आणि सोन्यापेक्षाही अधिक पटीने परतावा देण्याची क्षमता जमिनीत असते.

मात्र, जमीन व्यवहारात एक छोटी चूकही तुमच्या आयुष्यभराची कमाई अडकवून ठेवू शकते. जमिनीत पैसा कमावण्यासाठी केवळ 'लोकेशन' पुरेसे नाही, तर खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

१) 'क्लीन टायटल' असणे
◼️ जमिनीच्या बाबतीत सर्वांत मोठा धोका कायदेशीर कागदपत्रांचा असतो.
◼️ अनेकदा स्वस्त जमिनीच्या मागे वारसा हक्क वाद, सरकारी आरक्षण किंवा जुन्या नोंदीतील तफावत असू शकते.
◼️ टोकन देण्यापूर्वी नामांकित वकिलाकडून किमान ३० वर्षांचा 'टायटल सर्च' रिपोर्ट करून घेणे अनिवार्य आहे.

२) भविष्यातील विकास ओळखा
◼️ जमीन आज कशी दिसते, यापेक्षा पुढील १०-१५ वर्षात त्या भागाचा चेहरामोहरा कसा बदलेल, याचा विचार करा.
◼️ नवीन हायवे, मेट्रो, इंडस्ट्रियल कॉरिडॉर किंवा सरकारी विकास आराखडा जमिनीचे भाव रात्रीत वाढवू शकतो
◼️ हुशार गुंतवणूकदार शहराच्या विकास आराखड्याचा अभ्यास करतात.

३) वेळेचे गणित
◼️ जेव्हा एखाद्या भागाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होते, तेव्हा तिथल्या किमती आधीच वाढलेल्या असतात.
◼️ अशा वेळी गुंतवणूक केल्यास परतावा कमी मिळतो.
◼️ विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खरेदी केली आणि किमान ७ ते १२ वर्षे धरून ठेवली तरच जमिनीतून लाभ मिळतो.

४) शेतजमीन की 'एनए' NA
◼️ अनेकजण स्वस्त मिळते म्हणून शेतजमीन घेतात, पण त्याचे अकृषक (एनए) जमिनीत रूपांतर करणे कठीण असू शकते.
◼️ केवळ 'कन्व्हर्जन होईल' या आशेवर गुंतवणूक करणे हा जुगार ठरू शकतो.
◼️ शहराच्या वाढत्या मर्यादेत किंवा हायवेजवळ एनए प्लॉट घेतल्यास ३ ते ५ वर्षात किमती दुप्पट होऊ शकतात.

महत्वाचे
◼️ जमिनीतील नफा हा ती विकताना नाही, तर ज्या दिवशी तुम्ही ती खरेदी करता, त्याच दिवशी ठरतो.
◼️ योग्य कागदपत्रे, भविष्यातील विकास आणि संयम असेल, तरच जमीन तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.
◼️ त्यामुळे जमीन घेताना अतिशय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

Web Title : भूमि निवेश पर अधिक लाभ: खरीदने से पहले चार बातों का ध्यान रखें

Web Summary : भूमि निवेश अच्छा रिटर्न देता है, पर सावधानी ज़रूरी है। टाइटल, भविष्य का विकास, समय और भूमि का प्रकार (एनए बनाम कृषि) जांचें। समझदारी से खरीद, धैर्य और सही दस्तावेज़ भूमि से धन बनाने के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Maximize Land Investment Returns: Four Key Factors to Consider Before Buying

Web Summary : Land investment offers significant returns, but requires caution. Check title, future development, timing, and land type (NA vs. agricultural). Smart purchases, patience, and proper documentation are crucial for wealth creation through land.