महाडीबीटी पोर्टलवर पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांना अर्ज सादर करणे व त्यांची निवड यासाठी चार टप्प्यात काम केले जाते. ते कसे केले जाते सविस्तर पाहूया.
फार्मर आयडीचा वापर करून गट नोंदणी
१) गट अर्जदारानी महाडीबीटी पोर्टलवर Login करुन प्रोफाईल तयार करणे (विद्यमान Existing on Mahadbt) गटानी त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड वापरावा. आणि नवीन नोंदणी करावयाच्या गटानी गटातील कोणत्याही एका सदस्याचा फार्मर आयडी वापरावा.
२) प्रोफाईल तयार झाल्यानंतर प्रत्येक वेळी केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरुन Login करावे. Login करुन इच्छुक घटकासाठी अर्ज सादर करणे, अर्ज केलेल्या अर्जदारांमधून PCFS तत्वावर गट लाभार्थाची यादी प्रकाशित केली जाईल.
३) FCFS मध्ये निवड झालेल्या गटाने अधिकृत सदस्याचा फार्मर आयडीचा वापर करुन login करावे, व लाभ द्यावयाच्या गटातील सदस्यांची माहिती भरावी.
४) गटातील सदस्यांची माहिती भरल्यानंतर त्यांचा अर्ज Scrutiny करिता संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे महाडीबीटी पोर्टलवरील Login मध्ये उपलब्ध होईल.
Login करिता सविस्तर महत्वाच्या सूचना
१) पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी दि. ३१.०३.२०२४ पूर्वी विविध शासकीय यंत्रणांकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था लाभ घेण्यास पात्र आहेत.
२) महाडीबीटी पोर्टलवर वैयक्तीक शेतकरी आणि शेतकरी गट असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
३) शेतकरी गटाला अर्ज करावयाचा असल्यास त्यांनी शेतकरी गट पर्याय निवडावा.
४) ज्या शेतकरी गटाची यापूर्वी महा-डीबीटी पोर्टल वर नोंदणी दिनांक ३१-मार्च-२०२५ पूर्वी झालेल्या गटांनी 'विद्यमान शेतकरी गट' पर्याय निवडून 'यूजरनेम आणि पासवर्ड' वापर करून लॉगिन करणे अपेक्षित आहे.
५) ज्या शेतकरी गटांनी यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, अश्या सर्व गटांनी "नवीन शेतकरी गट हा पर्याय निवडावा.
विद्यमान शेतकरी गटासाठी (Existing on Mahadbt) सूचना
१) ज्या शेतकरी गटांची दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी झाली आहे, अशा गटांनी "विद्यमान शेतकरी गट" पर्याय निवडून "यूजरनेम आणि पासवर्ड" वापरून लॉगिन करावे.
२) प्रोफाइल अंतर्गत गटाचे अध्यक्ष, सचिव आणि अधिकृत सदस्य (Authorized person) यांचे फार्मर आयडी वेरिफिकेशन पूर्ण करावे.
३) पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज सादर करतांना ज्या अधिकृत सदस्याचे प्रोफाईलच्या वेळी वेरीफिकेशन केले आहे, त्याच अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरुन पुनःश्च Login करावे.
४) अर्ज सादर केल्यानंतर त्यापुढे प्रत्येक वेळी महाडीबीटी पोर्टलवर केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरुन अर्जाची सद्य स्थिती तपासावी.
नवीन शेतकरी गटासाठी सूचना
१) जे शेतकरी गट महाडीबीटी पोर्टलवर दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी नोंदनीकृत नाहीत, अशा गटांनी महाडीबीटी पोर्टलवरील नवीन शेतकरी गट हा पर्याय निवडून कोणत्याही गटातील कोणत्याही एका सदस्यांच्या फार्मर आयडी ने प्रथमतः लॉगिन करावे.
२) Login केल्यानंतर प्रोफाइल अंतर्गत "गटाचे अध्यक्ष, सचिव आणि अधिकृत सदस्य (Authorized person) यांचे फार्मर आयडी वेरिफिकेशन पूर्ण करावे.
३) पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज सादर करतांना ज्या अधिकृत सदस्याचे प्रोफाईलच्या वेळी वेरीफिकेशन केले आहे, त्याच अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरून पुन:श्च Login करावे.
४) अर्ज सादर केल्यानंतर त्यापुढे प्रत्येक वेळी महाडीबीटी पोर्टलवर केवळ अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरुन अर्जाची सद्य स्थिती तपासावी.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा; पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच