Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

How to prepare sugarcane seedlings on a raised bed at low cost? Learn in detail | कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

Sugarcane Nursery शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात.

Sugarcane Nursery शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात.

शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात.

सध्या शेतकरी बेणेएवजी एक डोळा रोप लागणीस प्राधान्य देताना दिसून येत आहे, कारण रोपाद्वारे लागण केल्यास बियाणे खर्चात व लागण खर्चात बचत होऊन किमान एक महिना वेळेमध्ये बचत होते.

ऊस रोपे निर्मितीसाठी गादी वाफा पध्दत
◼️ यासाठी १ मीटर रूंदीचे व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत.
◼️ गादी वाफे तयार करताना तळाशी प्लॅस्टीक पेपर किंवा खतांच्या रिकाम्या पिशव्या अंथरून घ्याव्यात.
◼️ चांगले कुजलेले शेणखत व मातीचा मिश्रणाच्या सहा इंच जाडीचा थर द्यावा.
◼️ यानंतर बुरशीनाशक व किटकनाशकाची बेणे प्रक्रिया केलेल्या दोन इंचाच्या एक डोळा कांड्या घ्याव्यात.
◼️ एक ते दोन इंच कांडीतील अंतर व दोन ओळीतील अंतर एक इंच याप्रमाणे मांडणी करावी.
◼️ दोन ते अडीच सें.मी. मातीचा थर वर दिल्यास अर्ध्या गुंठा क्षेत्रा (५० चौ.मी.) मध्ये एक हेक्टरला पुरतील एवढे रोपे तयार होतात.
◼️ रोपे काढताना गादी वाफ्यास पाणी देवून रोपे काढल्यास मुळ्या तुटत नाहीत आणि सुकत नाहीत.
◼️ काढलेल्या रोपांची लागवड लवकर केल्यास रोपे मरीचे प्रमाण कमी होते.
◼️ यासाठी खर्चसुध्दा कमी येऊन बेणे वाहतुकीचा खर्च कमी होतो.

अधिक वाचा: नर्सरीमधून फळांची रोपे खरेदी करताना त्यांची निवड कशी करावी? लागवड कशी करावी? वाचा सविस्तर

Web Title: How to prepare sugarcane seedlings on a raised bed at low cost? Learn in detail