lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

How to identify naturally ripened mangoes? | Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

Mango Ripening नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे कसे ओळखायाचे?

वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापाऱ्यांकडून आंब्याला रासायनिकरीत्या पिकवून बाजारात आणण्याचे प्रमाणही वाढीस लागण्याची भीती आहे.

वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापाऱ्यांकडून आंब्याला रासायनिकरीत्या पिकवून बाजारात आणण्याचे प्रमाणही वाढीस लागण्याची भीती आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ओळखल्या हापूस जाणाऱ्या आंब्यासह इतर प्रकारचे आंबे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मे महिना हा आंब्याचा हंगाम असलेला मानला जातो.

वाढती मागणी लक्षात घेता काही व्यापाऱ्यांकडून आंब्याला रासायनिकरीत्या पिकवून बाजारात आणण्याचे प्रमाणही वाढीस लागण्याची भीती आहे. त्यामुळे अशाप्रकारे रासायनिक आंबा विकणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लक्ष ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

कसे ओळखाल नैसर्गिकरीत्या पिकलेले आंबे?
इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनामुळे फिकणारी फळे ही पिकल्यानंतर थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग सगळीकडून सारखाच दिसतो. रासायनिक आंबा कापल्यानंतर, त्याच्या आत हिरवे किंवा पांढरे डाग दिसतात. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आतून पिवळा दिसतो.

रसायने वापरून पिकविलेले आंबे
कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेली फळे घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही, फळामध्ये योग्य ती पिकविण्याची प्रक्रिया न झाल्याने ती चवीला आंबट किंवा चवहीन असतात.

खाण्यास योग्य फळे
जैवरासायनिक प्रक्रिया झालेली आंब्यांसह इतर फळे खाण्यास योग्य असतात. यात कच्चे फळ ८ ते १० प्रक्रियेतून जात असते. यात रंग येणे, स्वाद निर्माण होणे, साखरेचे प्रमाण वाढणे, आम्लता कमी होणे, मऊपणा येणे अशी लक्षणे आंबे तसेच इतर फळांमध्ये दिसल्यास ही फळे खाण्यायोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी आंबा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावा.

कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे आरोग्याला घातक
■ रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकविलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पेष्टिक अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोपेची अडचण असे अनेक आजार होऊ शकतात.
■ गर्भवतींना होणाऱ्या बाळाला त्याचा अपाय होतो. तसेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून मधुमेह, हायपोथायरॉईड अशा समस्या निर्माण होऊ शकतात. पार्किंसन्स, कर्करोग यांसारख्या आजारांची भीती डॉक्टर व्यक्त करतात.

कायद्याच्या कडक अंमलबजावणीची आवश्यकता
बंदी घातलेल्या रसायनाने आंबे, फळे पिकवणे हा अन्न सुरक्षा व मानके या कायद्यानुसार गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळलेल्यांना पाच वर्षांची शिक्षा व लाखो रुपये दंडाची तरतूद आहे; मात्र कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे काही व्यापारी खुलेआमपणे रसायनांचा वापर करतात.

फळ विक्रेत्यांना कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यावर बंदी आहे. कोणीही विक्रेता अशा प्रकारे फळे पिकवून विकताना आढळल्यास त्याच्याकडील सर्व माल जप्त करून तो नष्ट केला जातो. असा प्रकार आढळल्यास नागरिकांनी कळवावे, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. - अन्न व औषध प्रशासन विभाग

अधिक वाचा: मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

Web Title: How to identify naturally ripened mangoes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.