Lokmat Agro >स्मार्ट शेती > सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

How to cultivate the aromatic plant 'Gawati Tea'? Know detailed information | सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Lemon Grass Farming : गवती चहा ही गवताच्या कुळातील एक बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. हिला प्रामुख्याने सर्दी-पडसे यांसारख्या आजारांवर उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.

Lemon Grass Farming : गवती चहा ही गवताच्या कुळातील एक बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. हिला प्रामुख्याने सर्दी-पडसे यांसारख्या आजारांवर उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

गवती चहा ही गवताच्या कुळातील एक बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे. प्रामुख्याने सर्दी-पडसे यांसारख्या आजारांवर उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून देखील गवती चहाला ओळखले जाते. या वनस्पतीपासून मिळणाऱ्या सुगंधी तेलास मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्याचा उपयोग विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये केला जातो.

गवती चहाच्या पानांमध्ये ०.२५ ते ०.५० टक्के तेलाचे प्रमाण असते. या तेलात सिट्रल (७५ ते ८५ टक्के) हे प्रमुख घटकद्रव्य असून त्याचा वापर व्हिटॅमिन ‘ए’ उत्पादनात केला जातो. याशिवाय हे तेल साबण, केसांचे तेल, अत्तर, औषधे, तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत वापरले जाते.

कोकण व सुगंधी वनस्पती

सुगंधी वनस्पतींना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारीदृष्ट्या लागवड आवश्यक आहे. कोकण भागाला सुगंधी वनस्पती परकी नाहीत. खरं तर कोकण हा सुगंधी वनस्पतींचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. पावसाळ्यात येथे डोंगर उतारांवर आणि जंगलांमध्ये विविध सुगंधी वनस्पती नैसर्गिकरित्या वाढताना दिसतात. काही वनस्पतींसाठी उष्ण व दमट हवामान उपयुक्त ठरते.

सुगंधी द्रव्ये ही उडणाऱ्या तेलाच्या स्वरूपात असल्याने अतितापमानामुळे तेलाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. दरम्यान राज्यातील सर्व भागांची हवामान व जमीन सुगंधी वनस्पतीसाठी उपयुक्त नसली तरी कोकणातील नारळाच्या बागांमध्ये अथवा डोंगर उतारांवर गवती चहा सहज लागवड करता येऊ शकतो.

गवती चहा लागवडीसाठी आवश्यक बाबी

हवामान : गवती चहा हे समशीतोष्ण हवामानातील पीक आहे. याला वाढीसाठी उष्ण, दमट हवामान आणि पुरेसा पाऊस आवश्यक असतो.

जमीन : कोकणातील लालसर, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य ठरते.

पूर्वमशागत : लागवडीसाठी जमिनीची चांगली नांगरणी करावी. उभी किंवा आडवी कुळव द्यावी. प्रति हेक्टर ८ ते १० टन कुजलेले शेणखत मिसळावे.

लागवड : फुटवे लावताना प्रत्येक दोन रोपांमध्ये ६० सें.मी. अंतर ठेवावे. योग्य मशागत केल्यास पिकाची वाढ चांगली होते.

खत व्यवस्थापन : लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. त्यानंतर प्रत्येक कापणीनंतर ५० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावा.

पाणी व्यवस्थापन : पावसाळ्यात पाणी देण्याची आवश्यकता नसते. उन्हाळ्यात दर १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.

कापणी व्यवस्थापन व उत्पादन : गवती चहाच्या वर्षातून ३ ते ४ कापण्या करता येतात. उच्च प्रतीचे तेल मिळवण्यासाठी कापणी वेळेवर करणे आवश्यक आहे.

• पहिली कापणी लागवडीनंतर ३-४ महिन्यांनी करावी.
• गवत जमिनीतून अर्ध्या फूट उंचीवर कापावे.
• पहिल्या वर्षी ५० ते ७० टन ओलं गवत मिळते, तर दुसऱ्या वर्षापासून १०० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.
• यापासून सुमारे ३५० किलो सुगंधी तेल मिळते.

प्रा. संजय बडे
सहाय्यक प्राध्यापक
कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय दहेगाव
ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर. 
 

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

Web Title: How to cultivate the aromatic plant 'Gawati Tea'? Know detailed information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.