Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जाती

Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जाती

Gajar Lagwad : High yielding and early harvesting carrot varieties read in detail | Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जाती

Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जाती

गाजर थंड हवामानातील पीक आहे. थंड हवामान असलेल्या प्रदेशामध्ये पावसाळा, उन्हाळा व थंडीच्या ऋतुमध्ये पूर्ण वर्षभर गाजराचे उत्पादन घेतले जाते.

गाजर थंड हवामानातील पीक आहे. थंड हवामान असलेल्या प्रदेशामध्ये पावसाळा, उन्हाळा व थंडीच्या ऋतुमध्ये पूर्ण वर्षभर गाजराचे उत्पादन घेतले जाते.

गाजर थंड हवामानातील पीक आहे. थंड हवामान असलेल्या प्रदेशामध्ये पावसाळा, उन्हाळा व थंडीच्या ऋतुमध्ये पूर्ण वर्षभर गाजराचे उत्पादन घेतले जाते.

गाजराचे युरोपीयन व आशियाई असे दोन गट पडतात. युरोपियन गटामध्ये थंड हवामानात वाढणारे असतात. अशियाई गटामध्ये उष्ण हवामानात वाढणाऱ्या असतात.

युरोपियन जाती
या वाणाच्या गाजराचा रंग केसरी किंवा नारंगी असून आकार सारख्या जाडीचा असतो आणि गाजराचा मधला भाग अतिशय लहान असतो. या जातीच्या पानांची वाढ कमी असते. या जातीची गाजरे खाताना कोरडी लागतात आणि लवकर काढणीला तयार होतात. या गटातील खालील जाती भारतात लोकप्रिय आहेत.

१) नॅनटस
- ही गाजराची थंड हवामानात उत्तम वाढणारी जात आहे.
- या जातीचे गाजर मध्यम लांबीचे, टोकापर्यंत एकसारख्या जाडीचे आणि चांगल्या आकाराचे असते.
- गाजरामध्ये आतील गाभ्याचा कठीण भाग अतिशय थोडा असतो आणि त्याचा रंग इतर भागासारखा नारंगी असतो.
- या गाजरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते.
- गाजरावर तंतुमय मुळे नसतात.
- या जातीचे उत्पादन चांगले येते. परंतु या जातीचे बिजोत्पादन आपल्याकडील हवामानात होऊ शकत नाही.
- पेरणीपासून ७०-१०० दिवसांत पीक तयार होते.

२) चॅटनी
- या जातीची गाजरे अतिशय आकर्षक असतात.
- गाजरे गर्द लालसर व नारंगी रंगाची असतात
- या गाजराची लांबी मध्यम (११.५ ते १५ सेंमी) ३.५ सेंमी व्यासाची असून त्याची चव व गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट असते.
- गर गोड, मुलायम असतो.
- ही जात कॅनिंग आणि साठवणीपर्यंत चांगली आहे.
- हेक्टरी उत्पादन १५ टन मिळते.

३) पुसा जमदग्नी
- हा वाण ९९८१ व नानटस हाफ लॉगच्या संकरातून विकसित केला आहे.
- आतील भाग एकसारख्या रंगाचा आहे.
- गाजर १५-१६ सेंमी लांब, केशरी रंगाचे, वरच्या बाजूला जाड असून खाली बारीक होत जाते.
- कॅरोटीनचे प्रमाण अधिक असलेला हा वाण लवकर तयार होतो आणि उत्पन्न जास्त असते.

याशिवाय गाजराच्या डॅनव्हर्स, जेजो, इंपरेटर, इत्यादी युरोपीयन वाणांची लागवड थंड हवामानात करण्यात येते.

अधिक वाचा: Anjeer Variety : अंजीराच्या कोणत्या जातीत किती साखरचे प्रमाण वाचा सविस्तर

Web Title: Gajar Lagwad : High yielding and early harvesting carrot varieties read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.