lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

Do this planning to increase production of summer sesame crop | उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

उन्हाळी तीळ पिकाच्या उत्पादन वाढीसाठी असे करा नियोजन

महाराष्ट्रात तीळ हे सलग पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेतले जाते. तीळ या पिकाची लागवड खरीप, अर्ध-रबी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते.

महाराष्ट्रात तीळ हे सलग पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून घेतले जाते. तीळ या पिकाची लागवड खरीप, अर्ध-रबी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

तीळ या पिकाची लागवड खरीप, अर्ध-रबी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबिया पिक असून, तीळ या पिकाचे मूळ स्थान भारत असून त्याला तेलबियांची राणी असेही संबोधतात. जगात तिळाखालील क्षेत्र व उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो.

आंतरमशागत व तण व्यवस्थापन
आवश्यकतेनुसार २-३ कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदन करून शेत स्वच्छ ठेवावे. पिक एक महिन्याचे होईपर्यत तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

ओलीत व्यवस्थापन
उन्हाळी तिळास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिसांनी ओलीत करावे. पिक फुलोऱ्यात येण्याची अवस्था ही अति संवेदनशील आहे, म्हणून फुलोऱ्यास सुरुवात होताना व बोंडे भरताना ताण पडू देऊ नये. अशा अवस्थेत ओलीत करावे. मात्र अति पाणीपुरवठा हा वजनात उतार, तेल उताऱ्यात घट व विविध बुरशीजन्य रोगास कारणीभूत ठरतो, म्हणून ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या बांधावर ह्या बहुपयोगी वनस्पतीचे एक तरी झाड असायला हवं

पिक संरक्षण
तिळावर तुडतुडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व बोंड पोखरणारी अळी या प्रामुख्याने आढळणाऱ्या किडी आहेत. तुडतुडे पानाचे खालचे बाजुस राहून रसशोषण करतात व पर्णगुच्छ रोगाचा प्रसार करतात. गादमाशी ही कीड फुलाचे आतील भागात अंडी घालते.

अळ्या बाहेर पडून फुलातील स्त्री पुंकेसर खाऊन नष्ट करते व अशा ठिकाणी बोंड न तयार होता बोंडाचे रुपांतर गाठीत होते. अशा गाठीत बी तयार होत नाही. यांच्या बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मि.ली. किंवा कार्बारील ५०% भुकटी ४० ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. 

परिपक्वता व काढणी
ज्यावेळी झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरूवात होते, त्यावेळी पीक कापणीस तयार झाले असे समजावे. तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते. त्यामुळे कापणी वेळेवर करावी. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात.

३-४ दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या सहाय्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास ४-५ दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे.

उत्पन्न
तिळाच्या पिकापासून प्रति एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन मिळते.

Web Title: Do this planning to increase production of summer sesame crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.