Lokmat Agro >स्मार्ट शेती > खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

Do not neglect weed control in kharif crops otherwise the yield will not be achieved | खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

खरीप पिकांतील तण नियंत्रणास करू नका दुर्लक्ष; अन्यथा साधणार नाही उत्पादनाचे लक्ष

खरीप पिकातील तण नियंत्रणासाठीचा कृषीसल्ला ..

खरीप पिकातील तण नियंत्रणासाठीचा कृषीसल्ला ..

शेअर :

Join us
Join usNext

शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठांचा योग्य वापर करून अधिकाधिक उत्पादन काढणे आज आवश्यक बनले आहे. योग्य तण व्यवस्थापन एक महत्वाची बाब आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात तण नियंत्रणाची विशेष काळजी घेतल्यास नुकसान कमी प्रमाणात होते. तणामुळे पाणी, अन्नद्रव्य व जागेसाठी स्पर्धा होते.

खरीप पीकात वाढणारी विविध तणे

अ) एकदल वर्गीय तणे : लोना, केना, भरड, शिप्पी, चिकटा, हराळी, लव्हाळा, कुंदा, चिमणचारा, वाघनखी इत्यादी

ब) व्दिवल वर्गीय तणे : दिपमाळ, दुधी, माठ, काठेमाठ, कुंजरू, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, शेवरा, पाथरी, चांदवेल, कुरूडु, गाजरगवत, उन्हाळी इत्यादी.

तणांची वैशिष्टये : तणांना निसर्गानेच काही अशी वैशिष्टये दिली आहेत की, आपण वर्षानुवर्ष अनेक उपाय योजुनही ती आजही तग धरून आहेत त्यांचा नायनाट होत नाही. प्रचंड बिजोत्पादन क्षमता, वेगवेगळी बियाण्यांची सुप्त अवस्था, प्रतिकुल परिस्थितीत तग धरून वाढण्याची क्षमता, कमी कालावधी, लवकर फळे, फुले लागणे, सहज प्रसार या गुणधर्मामुळे तणे पिकांच्या उत्पादनात घट आणतात.

खरीप पीकातील पीक तण स्पर्धेचा काळ

मका (१५ ते ३५ दिवस), भात (१५ ते ४५ दिवस), ज्वारी (१५ ते ४५ दिवस), बाजरी (२५ ते ४५ दिवस), सोयाबीन (१५ ते ४५ दिवस), उडिद (३० ते ४५ दिवस) सदरील पीक व तण स्पर्धेचा काळ पेरणीनंतरचे दिवस गृहित धरावे.

तणांमुळे होणारे पीक उत्पादनाचे नुकसान

अ.क्र.खरीप पीकनुकसान (टक्के)
भात २५ ते ४०
मका४९
३ खरीप ज्वारी ६० ते ७०
४ बाजरी२५ ते ४०
५ ऊस४० ते ६०

तणांमुळे होणारे नुकसान :

१) पिकाच्या दर्जात होणारी घट
२) पिकाच्या उत्पादनात येणारी घट
३) पीक उत्पादन खर्चात होणारी वाढ
४) तणे मनुष्यालाही अपाय करतात
५) किटक व रोगांना आसरा देतात
६) तण शेती अवजारांची झीज करतात
७) तणे जमिणीची किंमत कमी करतात
८) पाण्याच्या पाटाची वहन क्षमता कमी होते.

तणांचा बंदोबस्त करण्याच्या पद्धती

१) प्रतिबंधात्मक उपाय :
१) स्वच्छ बी-बीयाणे वापरणे
२) चांगले कंपोस्ट व शेणखत वापरणे
३) बी धरण्यापुर्वी तणांचे रोपटे काढुन टाकावे
४) तणांची वाढ नाहीसी करणे
५) शेताचे बांध, पाण्याचे पाट, पाट व चर व भोवतालचे रस्ते तणांपासून मुक्त ठेवावेत
६) अवजारांपासून तणांचा प्रसार रोखण्यासाठी तणमुक्त शेताची मशागत केल्यानंतर अवजारे स्वच्छ करून दुसऱ्या शेताकडे न्यावीत.

२) निवारणात्मक उपाय
यामध्ये हाताने वापरावयाची अवजारे, बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढली जाणारी मशागतीची अवजारे यांचा समावेश होतो. हाताने तण उपटने तसेच हातकोळपणी व खुरपणी करून तण काढणे व खांदणी करणे. पिकांच्या दोन ओळीत आच्छादनाचा वापर करून तणांचा बंदोबस्त करता येतो.

३) जैविक तण नियंत्रण
या पद्धतीमध्ये किटकाव्दारे, जीवजंतूव्दारे (बुरशी, जिवाणू, विषाणू व सुत्रकृमी इत्यादी) तसेच परोपजीवी वनस्पतीव्दारे तणांचे नियंत्रण केले जाते. उदा. कोचीनियल किडीचा वापर करून निवडुंगाचा नाश करता येतो तसेच गाजरगवताच्या नियंत्रणासाठी मॅक्सीकन भुंगे वापर करता येतात.

४) रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्त
निरनिराळी उपयुक्त रसायने वापरून तणांचा बंदोबस्त करता येतो. या पद्धतीमध्ये जी रसायने वापरली जातात त्यांना तणनाशक असे म्हणतात. रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण करतांना काही महत्वाच्या तांत्रिक बाबी पुढीलप्रमाणे
१) लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे
२) तणनाशकाचा शिफारशित मात्रा इतकाच वापर करणे त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे, तणनाशक फवारणी पद्धतीनूसार नोझलचा वापर करणे, योग्यवेळी तणनाशकाची फवारणी उदा. पिक व तणे उगवणीपुर्वी व उगवणीपश्चात पिकावर व तणावर फवारणी करणे.

विविध खरीप पिकातील शिफारशीत तणनाशके

अ.क्रपिकाचे नावतणनाशकप्रमाण प्रती १० लि. पाणीवापरण्याची पद्धत
सोयाबीन

पेंडीमियॅलीन ३८.७ टक्के सी.एस.

इमॅझीथायपर १० टक्के डब्लु.एस.एल

२० ते ३५ मिली 

२० मिली 

उगवणपुर्व

उगवणीपश्चात

मका अॅट्रॅझीन ५० डब्लु.पी.१५ ते ३० ग्रॅमउगवणपुर्व
भुईमुगइमॅझीथायपर १० टक्के एस.एल२० ते ३० मिलीउगवणपुर्व/उगवणीपश्चात
तूरपेंडीमिथैलीन ३० टक्के ई.सी.३५ ते ५० मिलीउगवणपुर्व
कापूस 

डीमियॅलीन ३८.७ टक्के सी.एस.

पायरीयोओबॅक सोडीयम १० टक्के ई.सी

२० ते २५ मिली

१२ ते १५ मिली 

उगवणपुर्व

उगवणपुर्व

ऊसमेटासल्फुरॉन मिथील ३० टक्के डब्लु.पी.०.६ ग्रॅमउगवणीपश्चात (३० ते ४० दिवस)

तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची दक्षता :

१) फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा.
२) तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा
३) फवारणी पंपासाठी शिफारशीत नोझलचा वापर करावा.
४) तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गढुळ व गाळयुक्त पाणी वापरू नये.
५) उभ्या पिकात तणनाशके फवारतांना हुडचा वापर करावा.

लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या विभाग)
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय
दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३, मो. नं. ७८८८२९७८५९

हेही वाचा - आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

Web Title: Do not neglect weed control in kharif crops otherwise the yield will not be achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.